शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणात तिघांना अटक, पोलीस कोठडी सुनावली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 02:11 IST

तलवारीने वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आमिन शब्बीर शेख, शादाब ऊर्फ मोनू आसिफ

पुणे : तलवारीने वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आमिन शब्बीर शेख, शादाब ऊर्फ मोनू आसिफ अन्सारी, नदीम अहमद शेख (तिघेही वय १९, रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

निहाल ऊर्फ गंड्या जनार्दन लोंढे (वय १९, रा. येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुल सतीश कांबळे (वय १९, रा. येरवडा) गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जनार्दन वसंत लोंढे (वय ३८, रा. येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. २२ आॅगस्टला रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.लोंढे यांचा मुलगा निहाल, त्याचा मित्र राहुल याच्यासोबत दुचाकीवरून बाहेर गेले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत मुलगा घरी न आल्याने लोंढे आणि त्यांचे जावई त्याला शोधण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी डेक्कन कॉलेज रोड येथे तीन ते चार लोकांंनी निहाल याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला. तर राहुल याच्यावर वार करून गंभीर जखमी केल्याचे लोंढे यांना समजले, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त करण्यासाठी, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? हा गुन्हा त्यांनी नक्की कोणत्या कारणासाठी केला? याचा शोध घेण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील वामन कोळी यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हाPuneपुणे