वाघोली : उसने पैसे घेऊन ते परत न देता शिवीगाळ व मारहाण करत असल्याने सणसवाडी येथील तीन मित्रांनी एकत्र येत आपल्या पेंटर मित्राचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता भोसले यांचा त्यांच्या राहत्या खोलीमध्ये खून करण्यात आला. या खूनप्रकरणी प्रमोद श्रीकांत काशीद (वय-२७,रा.बीड),अतुल नाथराव मुसळे (वय-२०,रा-लातूर) अमोल तानाजी चौधरी (वय-२६,रा-पंढरपूर सध्या तिघेही रा.सणसवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या तीन मित्रांनी भोसले यांच्याकडून वेळोवेळी पैसे उसने घेतले होते. ते पैसे परत न देता शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचा मनात राग मनात धरून २२ मार्च रोजी रात्री भोसले यांच्या राहत्या रूममध्ये चाकूने गळा चिरून खून करण्यात आव्ला होता. बंद खोलीमधून उग्र वास येत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. भोसले यांच्या रूमचे मालक मिथुन कंद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणीकंद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी खुना संबंधित केलेल्या चौकशीत काशीद, मुसळे, चौधरी या तिघा जणांनीच खून केल्याचे निष्पन्न झाले. या आरोपींना पकडण्यासाठी पथके तयार करून लातूर, उस्मानाबाद येथे जाऊन तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. लोणीकंद पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस सुधीर तोरडमल,महेश चव्हाण,बाळासाहेब सकाटे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.
उसन्या पैश्यांवरून तिघा जणांनी केला मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 14:58 IST
दत्ता भोसले यांचा त्यांच्या राहत्या खोलीमध्ये खून करण्यात आला होता.
उसन्या पैश्यांवरून तिघा जणांनी केला मित्राचा खून
ठळक मुद्देभोसले यांच्या रूमचे मालक मिथुन कंद यांनी दिलेल्या फिर्याद