भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: December 15, 2015 16:40 IST2015-12-15T16:40:38+5:302015-12-15T16:40:38+5:30
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला असून या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ - पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला असून या अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाच नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वजन लातूर कडील उमरगा येथिल असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अपघातात जखमी झालेल्यानां उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लोणीदेवकर येथे इरटिका कार आणि ऊस वाहतूक करणारा टॅक्टर यांच्यात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मृत झालेल्या ३ जणात एकाच कुटुंबातील आई व मुलाचा समावेश असल्याचं समजते आहे.