वराळेत तिघांना बेदम मारहाण
By Admin | Updated: February 23, 2017 02:28 IST2017-02-23T02:28:28+5:302017-02-23T02:28:28+5:30
निवडणूक सुरू असलेल्या मतदान केंद्रात विनाकारण आत घुसल्याच्या कारणावरून चिडून जाऊन

वराळेत तिघांना बेदम मारहाण
आसखेड : निवडणूक सुरू असलेल्या मतदान केंद्रात विनाकारण आत घुसल्याच्या कारणावरून चिडून जाऊन संगनमताने वराळे गावच्या माजी सरपंचासह सहा जणांच्या टोळक्याने वराळे (ता. खेड) गावच्या हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसमोर बेकायदा जमाव जमवून तिघांना शिवीगाळ दमदाटी करीत हाताने व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी बुधवारी (दि. २२) सहा जणांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व पोलीस उपनिरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.
मयूर दत्तात्रय बुट्टे-पाटील (वय २६ वर्षे, रा. वराळे, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा फिर्याद दिली. वराळे गावचा माजी सरपंच विश्वास आनंदराव बुट्टे-पाटील (वय ३४ वर्षे, रा. वराळे, ता. खेड), अतुल दत्ता भालेराव (वय २२ वर्षे, रा. राक्षेवाडी, खेड), सूरज शंकर कामठे (वय २२ वर्षे, रा. वराळे), सागर देवदास कौटकर (वय २२ वर्षे, रा. निमगाव, ता. खेड), मच्छिंद्र चंद्रकांत पडवळ (वय २२ वर्षे, रा. शेलू) व अक्षय सुदाम ठाकूर (वय २३ वर्षे, रा. ठाकूर पिंपरी, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक गुरुवारी असल्याने मयूर बुट्टे हा राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार अमोल पानमंद यांच्या बूथवर काम करत होता. मयूर व त्याचा भाऊ अक्षय बुट्टे (वय २३ वर्षे) हे दोघे मतदारांना स्लिपा वाटण्याचे काम करीत होते. त्या वेळी वाद होऊन मारामारी झाली. पोलीस उपनिरीक्षक महेश ढवाण व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.