महाळुंगेतील खूनप्रकरणी आणखी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:11 IST2021-05-25T04:11:55+5:302021-05-25T04:11:55+5:30

आकाश ऊर्फ गण्या रवी धरमाळे, ऋषिकेश ऊर्फ गोट्या सुनील भालेराव (महाळुंगे, ता. खेड), अभिषेक बुद्धसेन पांडे (खालुंब्रे, ता. खेड) ...

Three more arrested in Mahalunge murder case | महाळुंगेतील खूनप्रकरणी आणखी तिघे अटकेत

महाळुंगेतील खूनप्रकरणी आणखी तिघे अटकेत

आकाश ऊर्फ गण्या रवी धरमाळे, ऋषिकेश ऊर्फ गोट्या सुनील भालेराव (महाळुंगे, ता. खेड), अभिषेक बुद्धसेन पांडे (खालुंब्रे, ता. खेड) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर यापूर्वी अक्षय शिवळे, सोन्या पवार, दीपक पिंजण, वैभव खोंडगे व गौरव मुळे (सर्व रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड) यांना अटक केली होती. या साऱ्यांना न्यायालयात हजर केल्यावर त्यांना आठ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महाळुंगे येथील अतुल तानाजी भोसले (वय २६) याची दहा दिवसांपूर्वी म्हणजे शुक्रवार (दि. १४) महाळुंगे गावाच्या हद्दीत महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा पोलीस चौकीत हाकेच्या अंतरावर हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते. सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी ठिकठिकाणांहून हल्लेखोरांना ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार करत आहेत.

Web Title: Three more arrested in Mahalunge murder case