शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
4
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
5
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
6
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
7
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
8
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
9
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
10
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
11
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
12
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
13
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
14
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
15
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
16
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
17
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
18
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

रेशनवरील तीन महिन्यांचे धान्य जूनमध्येच मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 09:51 IST

राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

पुणे : पावसाळा तसेच महापुरासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीत आता राज्यात शिधापत्रिकेवरील तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या धान्याची उचल ३१ मेपर्यंत करण्याचे आदेश देण्यात आले असून, जिल्ह्यात आतापर्यंत २१ टक्के धान्य गोदामांमधून उचलण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. त्यामुळे ग्राहकांनी जूनमध्ये आपल्या हक्काचे तीन महिन्यांचे धान्य एकत्रित घेऊन जावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आगामी पावसाळा आणि परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे धान्याची कार्यक्षम वाहतूक आणि साठवणुकीसाठी राज्ये, तसेच केंद्रशासित प्रदेशांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता केंद्र सरकारने स्वतंत्र निर्देश दिले आहेत. त्यात लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी राष्ट्रीय अन्नधान्य सुरक्षा योजनेतील धान्यवाटपासाठी ऑगस्टपर्यंतच्या अन्नधान्याची आगाऊ उचल ३१ मेपर्यंत करून त्याचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानुसार जूनच्या नियतनाची उचल जलद गतीने पूर्ण करावी व जुलै व ऑगस्टच्या नियतनाची उचल सुरू करावी, अशा सूचना पुरवठा विभागाला देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यांकडून पूर्ण क्षमतेने अन्नधान्याची उचल करण्यासाठी वाहनांची संख्या वाढविण्यात यावी. धान्याची उचल ही जलद गतीने होण्याकरिता, धान्याची उचल ही थेट वॅगनमधून करण्यात यावी. त्यासाठी सुटीच्या अर्थात शनिवारी व रविवारी भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामांमधून उचल देण्यात येणार आहे, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या दिवशी देखील अन्नधान्याची उचल करण्यात यावी. सुटीच्या दिवसाच्या एक दिवस अगोदर सुटीच्या दिवशी उचल करण्यात येणाऱ्या अन्नधान्याची माहिती महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात यावी, जेणे करून महामंडळाला त्यानुसार व्यवस्था करणे शक्य होईल, असेही सुचविण्यात आले आहे.

सुधळकर म्हणाले, पावसाळ्यामुळे जून ते ऑगस्ट अशा तीन महिन्यांचे एकत्रित धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार महामंडळाच्या गोदामांमधून धान्याची उचल सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात २७ मेपर्यंत एकूण धान्याच्या २१ टक्के उचल पूर्ण झाली आहे. हे धान्य एकूण १८५९ दुकानांपैकी ५३१ दुकानांमध्ये पोच करण्यात आले आहे. ही उचल करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत आहे. काही तांत्रिक कारणास्तव उचल थोडी पुढे जाऊ शकते. मात्र, सरकारच्या सूचनेनुसार ३० जूनपर्यंत तिन्ही महिन्यांचे धान्य वाटप करण्यात येईल. दरम्यान, मे महिन्याचे पोच केलेल्या धान्यापैकी ७२ टक्क्यांहून अधिक ग्राहकांना वितरित करण्यात आल्याचेही सुधळकर यांनी स्पष्ट केले.

महिनानिहाय धान्य वाटप-- उचल (टनांमध्ये)

जून १२८९६--८१७०.८३जुलै १२७८३--००ऑगस्ट १४०४१--०० रेशन जोडपुणे शहरातील धान्य वाटप-- उचल

जून ६९४०.५० --४०००जुलै ६९४१.१५--००

ऑगस्ट ६९४१.१५--००एकूण उचल २५ टक्के

शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे धान्य उचल करण्यात अडचणी आल्या. त्यामुळे ३१ मेपर्यंत संपूर्ण धान्य उचलता येणे शक्य नाही. मात्र, लवकर उचल पूर्ण करण्यात येईल.  - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडfoodअन्न