लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिवाजीनगर येथील मुलांच्या निरीक्षणगृहातील सात वर्षांच्या चार मुलांवर तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बालकल्याण समितीने नेमलेल्या चौकशी समितीला मुलांनी ही गोष्ट सांगितल्याने हा प्रकार उघडकीस आला. शिवाजीनगर पोलिसांनी ३ अल्पवयीनांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी येरवड्याच्या निरीक्षणगृहात केली आहे. याप्रकरणी मच्छिंद्र सुतार (वय ३३, रा. केशवनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरच्या निरीक्षणगृहात मुलांवरील लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर प्रकरणांच्या चौकशीसाठी बालकल्याण समितीने एक समिती गठित केली. चौकशीअंती ७ वर्षांच्या चार मुलांनी तीन मुलांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती दिली. त्यावरून १४, १५ आणि ८ वर्षांच्या मुलाविरुद्ध समितीने कायदेशीर तक्रार दिली. त्यानंतर या मुलांना ताब्यात घेऊन त्यांना येरवडा मुलांच्या निरीक्षणगृहात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. देवधर करीत आहेत.
लैंगिक अत्याचारप्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात
By admin | Updated: May 7, 2017 03:20 IST