शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघांचा मृत्यू; दोन जण गंभीर जखमी

By नितीश गोवंडे | Updated: October 4, 2023 18:36 IST

टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू....

पुणे : शहरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले तर दोन जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पहिल्या घटनेत टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत रिक्षातील १८ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात येरवडा येथील शांती रक्षक सोसायटी समोर परिसरात घडला. यश बाळासाहेब खरचंद (१८) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे, तर मयुरी खरचंद आणि अरविंद जाधव अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी मनाली खरचंद (२४, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनाली या त्यांचा भाऊ यश, बहीण मयुरी हे २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास रिक्षाने प्रवास करत होते. त्यावेळी शांती रक्षक सोसायटी परिसरात समोरून आलेल्या भरधाव टेम्पोने रिक्षाला धडक दिली. या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान यशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विष्णू होले करत आहेत.दुचाकीस्वार महिलेने दिलेल्या धडकेत पादचारी ठार...

आंबेगाव परिसरात एका दुचाकीस्वार महिलेने पादचाऱ्याला दिलेल्या धडकेत पायी जाणारा तरूण ठार झाला. हा अपघात २ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडला. मदन नवराज परिहार (२७, रा. बालाजीनगर) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रामसिंग परिहार (४२, रा. नऱ्हे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख पुढील तपास करत आहेत.

टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू...

हडपसर परिसरात झालेल्या एका अपघातात टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. रवींद्रनाथ रामनकुट्टी नायर (५९, रा. निर्मल टाऊनशिप, काळेपडळ, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा श्रीराम नायर (२४) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस उपनिरीक्षक अमोल कामठे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड