संदीप मोहोळ खूनप्रकरणी सचिन पोटेसह तिघांना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:48+5:302021-07-23T04:08:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पौड फाटा येथे गॅगस्टर संदीप मोहोळ याचा निर्घुळ खुन केल्याप्रकरणी मोका विशेष न्यायालयाने सचिन ...

संदीप मोहोळ खूनप्रकरणी सचिन पोटेसह तिघांना जन्मठेप
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पौड फाटा येथे गॅगस्टर संदीप मोहोळ याचा निर्घुळ खुन केल्याप्रकरणी मोका विशेष न्यायालयाने सचिन पोटे, जमीर शेख आणि संतोष लांडे या तिघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यातील गुन्हेगार गणेश मारणे, राहुल तारुसह १३ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. मोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एन.सिरसीकर यांनी हा निकाल दिला आहे.
सचिन निवृत्ती पोटे, जमीर मेहबुब शेख आणि संतोष रामचंद्र लांडे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. या खटल्यात एकूण १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले होते. खटल्याच्या दरम्यान यातील पांडुरंग मोहोळ आणि दिनेश आवजी यांचा मृत्यु झाला होता.
गणेश मारणे, संजय कानगुडे, समीर ऊर्फ सम्या शेख, सचिन मारणे, राहुल तारु, अनिल खिलारे, विजय कानगुडे, शरद विटकर, निलेश माझीरे, राहुल शेख अशी निर्दोष मुक्तता झालेल्याची नावे आहेत.
संदीप मोहोळ हा ४ ऑक्टोंबर २००६ रोजी कारमधून जात असताना पौड फाटा येथे सिग्नलला कार थांबली. तेव्हा पाठीमागून आलेल्या हल्लेखोरांनी हातोड्याने कारच्या काचा फोडल्या व त्याच्यावर जवळून गोळ्या घालून निर्घुण खुन केला. टोळी युद्धातून हा खुन झाला होता. या प्रकरणा पोलिसांनी एकूण १८ जणांना अटक केली होती.
तत्कालीन जिल्हा सरकारी वकील अॅड. उज्ज्वला पवार, ॲड. विलास पठारे यांनी काम पाहिले. तर आरोपींकडून अॅड. सुरेशचंद्र भोसले, ॲड. डॉ. चिन्मय भोसले, अॅड. सुधीर शहा, अॅड. हर्षद निंबाळकर, ॲड. एन. डी. पवार अॅड. ॲड. संदीप पासबोला, अॅड. राहुल वंजारी, अॅड. अतुल पाटील, अॅड. धैर्यशील पाटील, अॅड. जितेंद्र सावंत, अॅड. राहुल भरेकर, अॅड. विपुल दुशिंग यांनी बाजू मांडली.
मारणे टोळीतील अनिल मारणे याचा २००५ मध्ये टोळी युद्धातून संदीप मोहोळच्या टोळीतील गुंडांनी खून केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी २००६ साली संदीप मोहोळ याचा पौड रोड परिसरात खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून स्पष्ट झाले होते.