तीनशे वर्षांपूर्वीचा ग्रंथ आढळला रस्त्यावर
By Admin | Updated: October 31, 2015 01:28 IST2015-10-31T01:28:20+5:302015-10-31T01:28:20+5:30
येथील एका रस्त्यावर तब्बल तीनशे वर्षांपूर्वी ‘नवनाथ भक्तीसार ग्रंथ’ आढळला. सव्वाशे वर्षांपूर्वी शिळाप्रेसवर छापला आहे. भांडारकर संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल व अभ्यासक वा. ल. मंजूळ यांना तो सापडला.

तीनशे वर्षांपूर्वीचा ग्रंथ आढळला रस्त्यावर
पुणे : येथील एका रस्त्यावर तब्बल तीनशे वर्षांपूर्वी ‘नवनाथ भक्तीसार ग्रंथ’ आढळला. सव्वाशे वर्षांपूर्वी शिळाप्रेसवर छापला आहे. भांडारकर संस्थेचे निवृत्त ग्रंथपाल व अभ्यासक वा. ल. मंजूळ यांना तो सापडला.
कोथरूड भागातील पं. जितेंद्र अभिषेकी उद्यानासमोरील फूटपाथवर प्लॅस्टिकच्या पिशवीत काही तरी वस्तू असल्याचे मंजूळ यांना गेल्या आठवड्यात आढळले. त्या पिशवीत काय आहे हे त्यांनी पाहिले असता त्यात ‘नवनाथ भक्तीसार ग्रंथ’ (कर्ता धुंडीसुतर आलो नरहरि, काळ शके १७४१) असल्याचे दिसून आले. इतकी दुर्मिळ प्रत रस्त्यावर पडलेली पाहून मंजूळ अचंबित झाले. त्यांनी हा ग्रंथ घरी आणून साफसूफ केला. पाने योग्य तऱ्हेने लावली. दत्त संप्रदायाचे अभ्यासक साळवी यांच्याकडे तो ग्रंथ सुपुर्द केला. मंजुळ म्हणाले, हा ग्रंथ का. म. थत्ते यांनी संपादित केला आहे. अपूर्व आणि दुर्मिळ हस्त लिखित असून त्यामध्ये ४० अध्याय सरासरी प्रत्येक अध्यायात पाच पाने आणि शेवटी रेखाचित्रे आहेत. पुण्यातील हस्तलिखित संग्रहालयात संस्कृत ग्रंथ जपले जातात पण मराठी ग्रंथाला फारसा वाव नाही.