कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: November 16, 2016 02:30 IST2016-11-16T02:30:33+5:302016-11-16T02:30:33+5:30

चाकण- शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावच्या हद्दीत मराठी शाळेसमोर भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने

Three die in containers | कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

चाकण : चाकण- शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावच्या हद्दीत मराठी शाळेसमोर भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील नवरा, बायको आणि मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १४) रात्री ७ च्या सुमारास घडली.
हनुमंत राणू ठाकर (वय ३५), सिंदूबाई हनुमंत ठाकर (वय ३१) व सचिन हनुमंत ठाकर (वय १२, सर्व रा. केळगाव, ता. खेड, सध्या रा. वडगाव घेणंद) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. (वार्ताहर)

Web Title: Three die in containers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.