कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
By Admin | Updated: November 15, 2016 03:55 IST2016-11-15T03:55:04+5:302016-11-15T03:55:04+5:30
कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू

कंटेनरच्या धडकेत तिघांचा मृत्यू
चाकण : चाकण- शिक्रापूर रस्त्यावर भोसे गावच्या हद्दीत मराठी शाळेसमोर भरधाव जाणाऱ्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील नवरा, बायको आणि मुलाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १४) रात्री ७ च्या सुमारास घडली.
हनुमंत राणू ठाकर (वय ३५), सिंदूबाई हनुमंत ठाकर (वय ३१) व सचिन हनुमंत ठाकर (वय १२, सर्व रा. केळगाव, ता. खेड, सध्या रा. वडगाव घेणंद, ता. खेड. जि. पुणे) असे या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुंमत ठाकर हे युनियन बँकेच्या शेलपिंपळगाव येथील शाखेत शिपाई म्हणून नोकरीला होते.