वाल्हे येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:11 IST2021-04-20T04:11:12+5:302021-04-20T04:11:12+5:30
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे; शासनाने अगोदरच विकेंड लॉकडाऊनचा आदेश दिला असल्याने, दर शनिवार, रविवार ...

वाल्हे येथे तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे; शासनाने अगोदरच विकेंड लॉकडाऊनचा आदेश दिला असल्याने, दर शनिवार, रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणारच आहे. सोमवार व शुक्रवार सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत किराणामाल व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवली जातील. मात्र या सर्वच दुकानदार तसेच दुकानातील कामगार वर्गाला अँटीजेन टेस्ट बंधनकारक आहे. मंगळवार ते गुरुवार जनता कर्फ्यू असल्याचेही खवले यांनी सांगितले.
तसेच यावेळी वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरण नियमित सुरू असणार आहे. तसेच अँटीजेन चाचणीही सुरू राहणार असल्याचे आरोग्य केंद्राचे पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी सांगितले. विनामास्क, विनाकारण रस्तावर फिरणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन वाल्हे पोलिस दुरक्षेञातील पोलिस हवालदार केशव जगताप, पोलिस नाईक संतोष मदने, समीर हिरगुडे,मंगेश घोगरे यांनी केले आहे.