शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
2
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
3
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
4
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
5
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
6
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
7
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
8
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
9
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
10
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
11
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
12
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
13
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
14
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
15
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
16
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
17
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
18
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
19
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
20
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू

हडप्पा संस्कृतीतील आर्यांचा थ्री-डी चेहरा तयार, डॉ. वसंत शिंदे यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 06:13 IST

भारत, अमेरिका आणि जर्मन या देशातील शास्त्रज्ञांनी एकत्रित संशोधन करून हडप्पा संस्कृतीमधील लोक हे बाहेरून आले नसल्याचे शास्त्रीय पुराव्यासह मांडले होते.

पुणे : हडप्पा संस्कृतीतील लोक बाहेरून आलेले नसून, ते मूळचे भारतीयच असल्याचे पुरातत्वीय व जनुकीय पुराव्यातून दिसून आले आहे. त्यातच संगणकीय प्रोग्रामच्या मदतीने येथील लोक कसे दिसत असावेत, याचे थ्रीडी चेहरे तयार केले आहेत. त्यामुळे प्रथमच हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा चेहरा जगासमोर आला. या पुराव्यांआधारे हडप्पातील लोक भारतीयच होते, हे ठामपणे सांगता येऊ शकते, असे डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

भारत, अमेरिका आणि जर्मन या देशातील शास्त्रज्ञांनी एकत्रित संशोधन करून हडप्पा संस्कृतीमधील लोक हे बाहेरून आले नसल्याचे शास्त्रीय पुराव्यासह मांडले होते. त्यात डॉ. वसंत शिंदे यांनी अमेरिकेतील ‘अ‍ॅनॅटॉमिकल सायन्स इंटरनॅशनल’ या जर्नलमध्ये ‘क्रेनियोफेशियल रिकन्स्ट्रक्शन आॅफ दि इंडस व्हॅली सिव्हिलायजेशन अ इंडिव्हिज्युल्स स्पाऊंडस अ‍ॅट ४,५०० इयर्स ओल्ड राखीगडी सिमेट्री’हा पेपर प्रसिद्ध केला आहे.

डॉ. शिंदे म्हणाले की, हडप्पा काळापासून आत्तापर्यंत माणसाच्या शरीरयष्टीत कोणताही बदल दिसत नाही. त्यामुळे बाहेरून आलेल्यांनी येथे येऊन संस्कृती स्थापन केली, हे पूर्ण खोटे असल्याचे सिद्ध होते. कोरियातील फॉरेन्सिक लॅबमध्ये कोरियन लोकांच्या पुरातन सांगाड्यावर केलेल्या प्रयोगांच्या धर्तीवरच हडप्पातील लोकांच्या सांगाड्यांचा अभ्यास करून हे लोक कसे दिसत असावेत, याचे थ्रीडी चित्र काढले आहे. हा अभ्यास भारतीय, ब्रिटीश व अमेरिकन शास्त्रज्ञांनी केला. मूळचे हडप्पा संस्कृतीमधील लोक सध्याच्या हरयाणातील लोकांप्रमाणे उंच, गोरेपान, शरिरयष्टीने चांगले होते. इथे काही लोक दक्षिण भारत, महाराष्ट्रातून गेले असावेत. व्यापाराच्या निमित्ताने भारताबाहेरून काही लोक इथे आले असावेत. त्यांचाही अभ्यास करता येऊ शकतो, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.कसा बनला चेहरा?हडप्पा संस्कृतीतील लोकांचा चेहरा तयार करण्यासाठी राखीगडी येथील कब्रस्थानमधील चांगल्या स्थितीतील सांगाडे घेतले. कवटीचा भाग घेऊन हाडांचे व्यवस्थित माप घेतले. मानेवरच्या सर्व भागाचे सिटी स्कॅन केले. मुखवटा बनवण्यासाठी कम्प्युटर प्रोग्राम तयार केला. हाडांवर स्थायू कसे असावेत याचाही अभ्यास केला. नंतर हाडांचे माप, सिटी स्कॅन व कम्प्युटर प्रोग्रामनुसार कवटीवर त्वचा बसविली. अशा प्रकारे हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा थ्रीडी चेहरा समोर आला.

टॅग्स :Puneपुणे