अल्पवयीन मुलीवर बलात्कार तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST2021-01-01T04:07:31+5:302021-01-01T04:07:31+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधीत पीडित अल्पवयीन मुलगी घरी जात असताना सौरभ व करण यांनी तिला अडवून जवळच्या शेतात ...

Three charged with raping minor girl | अल्पवयीन मुलीवर बलात्कार तिघांवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर बलात्कार तिघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार संबंधीत पीडित अल्पवयीन मुलगी घरी जात असताना सौरभ व करण यांनी तिला अडवून जवळच्या शेतात जबरदस्तीने नेले व तिच्यावर दोघांनीही बलात्कार केला. करण याने तिचे विवस्त्र अवस्थेतील फोटो मोबाईलमध्ये काढले. हा कार कोणाला सांगितल्यास तीचे छायाचित्र सोशल मिडीयात व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर हे दोघे तिथून आदित्यच्या दुचाकीवर बसून पसार झाले. याप्रकरणी संबधीत पीडितेने जुन्नर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस कर्मचारी सागर हिले, अनिल लोहकरे, सुधीर काठे आदींनी तातडीने कारवाई करून या यातील दोन आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक मंदार जवळे करत आहेत

--

Web Title: Three charged with raping minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.