दहशत माजवून शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:09 IST2021-06-22T04:09:29+5:302021-06-22T04:09:29+5:30

तळेगाव ढमढेरे येथे मोटारीतून जात असलेल्या युवकाला तिघांनी शिवीगाळ करून व दहशत माजवून गाडीची मोडतोड केल्याची घटना घडली. ...

Three charged with intimidation and abuse | दहशत माजवून शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

दहशत माजवून शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

तळेगाव ढमढेरे येथे मोटारीतून जात असलेल्या युवकाला तिघांनी शिवीगाळ करून व दहशत माजवून गाडीची मोडतोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुधीर संभाजी धुमाळ (वय ३५, रा. विशाल विश्व सोसायटी, तळेगाव ढमढेरे, ता.शिरुर, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. प्रेम ऊर्फ प्रेमचंद कदम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व अन्य दोघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि.१९) फिर्यादी सुधीर संभाजी धुमाळ हे त्यांच्या मोटारीतून घरी जात होते. या वेळी दुसऱ्या कारमधून आलेल्या आरोपींनी त्यांची गाडी फिर्यादीच्या मोटारीला आडवी लावली. मोटारीतून तीन युवक लाकडी दांडके व कोयता घेऊन खाली उतरले व सुधीर धुमाळ यांना बाहेर काढत त्यांच्या गाडीची मोडतोड केली. प्रेम ऊर्फ प्रेमचंद कदम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) व अन्य दोघांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंडित मांजरे पुढील तपास करत आहेत.

Web Title: Three charged with intimidation and abuse