धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:09 IST2021-06-05T04:09:29+5:302021-06-05T04:09:29+5:30

वाघोली (ता हवेली) येथे गुरुवारी (दि.३) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन दरम्यान युनिट ६ चे पथक गस्त घालत ...

Three charged with carrying a sharp weapon | धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

धारदार शस्त्र बाळगणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

वाघोली (ता हवेली) येथे गुरुवारी (दि.३) रात्री सव्वा दहाच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन दरम्यान युनिट ६ चे पथक गस्त घालत असताना बाजारतळ मैदानाच्या पाठीमागे दोघे संशयितरित्या थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने खात्री करून अरुण भास्कर चौधरी, महेश कृष्णा मैड या दोघांना पकडले असता पंचासमक्ष घेतलेल्या झडतीत त्यांच्याकडे लोखंडी तलवार मिळून आली आहे. केसनंद येथील जोगेश्वरी मिसळजवळ काही मुले दंगा करीत असतानाची माहिती गुरुवारी (दि.३) रात्री साडेबाराच्या सुमारास मिळाल्यानंतर लोणीकंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना बघून पळत असताना आशितोष नरेंद्र गायकवाड यास पकडून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ कुकरी चाकू मिळाला. तिघांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Three charged with carrying a sharp weapon