श्रीक्षेत्र ओतूर येथील शिवलिंगावरील तांदळाच्या तीन कलात्मक उभ्या पिंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:30+5:302021-08-24T04:15:30+5:30
कपर्दिकेश्वर हे ओतूरचे ग्रामदेैवत असून श्रावण महिन्यात गावात मोठी जत्रा भरत असते. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द ...

श्रीक्षेत्र ओतूर येथील शिवलिंगावरील तांदळाच्या तीन कलात्मक उभ्या पिंडी
कपर्दिकेश्वर हे ओतूरचे ग्रामदेैवत असून श्रावण महिन्यात गावात मोठी जत्रा भरत असते. मात्र गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द झाली. त्यामुळे गाव श्रावणातही सुनेसुने दिसत आहे. दर श्रावणी सोमवारी शिवलिंगावर कोरड्या तांदळाच्या उभ्या कलात्मक पिंडी सोमवारच्या संख्येनुसार साकारल्या जातात. या पिंडीसाठी भाविक रविवारी तांदूळ मंदिरात आणून ठेवतात त्या तांदळाच्या कलात्मक पिंडी साकारल्या जातात, ही शेकडो वर्षांची ग्रामपरंपरे असून ती यावर्षीही जतन करण्यात आली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे नागरिकांनी मंदिराकडे येऊ नये, असे आवाहन करण्यता आले. यावेळी देवधर्म संस्थेचे सचिव वसंत पानसरे, गजानन महाराज शिक्षण मंडळाचे सचिव वैभव ताबे, सचिन तांबे, महेंद्र गांधी, पानसरे, पुजारी गोविंद डुंबरे, सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे उपस्थित होते.
---
२३ ओतूर कपर्दिकेश्वर मंदिर
कपर्दिकेश्वर मंदिरात आरती करताना भाविक.