डोळ्यात चटणी टाकून सोन्याची चेन चोरणारे तिघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST2021-07-11T04:09:32+5:302021-07-11T04:09:32+5:30

याप्रकरणी नसीम दिलावर इनामदार (रा. कसबा, बारामती), फिरोजा असिफ सय्यद (रा. दौंड), सलीम मुजीब सय्यद (रा. पुणे) ...

Three arrested for stealing a gold chain with chutney in their eyes | डोळ्यात चटणी टाकून सोन्याची चेन चोरणारे तिघे जेरबंद

डोळ्यात चटणी टाकून सोन्याची चेन चोरणारे तिघे जेरबंद

याप्रकरणी नसीम दिलावर इनामदार (रा. कसबा, बारामती), फिरोजा असिफ सय्यद (रा. दौंड), सलीम मुजीब सय्यद (रा. पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अर्धा तोळा वजनाची सोन्याची चेन व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

४ जुलै रोजी घरात घुसून डोळ्यात चटणी टाकून सोन्याची चेन चोरून नेण्याची घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत तपास करीत सबंधितांचा शोध घेतला. या तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, सहायक फौजदार शिवाजी निकम, रूपेश साळुंके, सुहास लाटणे, दशरथ इंगोले, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Three arrested for stealing a gold chain with chutney in their eyes