विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST2021-01-08T04:28:32+5:302021-01-08T04:28:32+5:30

पुणे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी पतीसह तिघांना ...

Three arrested in marital suicide case | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांना अटक

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह तिघांना अटक

पुणे : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.

विशाल मनोहर बराटे (वय ३२), तुषार मनोहर बराटे (वय ३०) आणि रोहिणी मनोहर बराटे (वय ५०, तिघे रा. वारजे गावठाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी संगिता हरपळे (वय ४२, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली आहे. हरपळे यांची मुलगी प्रगती विशाल बराटे (वय २०) हिचा विवाह मे २०१९ मध्ये विवाह झाला होता. लग्नापासूनच माहेरहून हुंडा म्हणून ५० हजार रुपये व दिवाळीला सासरकडील लोकांना देण्यासाठी २ तोळे सोने घेऊन ये, अशी मागणी करुन तिचा छळ सुरु झाला होता. या छळाला कंटाळून प्रगती हिने ३ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस निरीक्षक अमृत मराठे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Three arrested in marital suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.