शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

दौंड व नारायणगावात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे तिघे जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 00:27 IST

रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर खरेदी करु नका

पुणे : दौंडनारायणगावातील वारुळवाडी अशा दोन ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळ्या बाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून १ लाख १९ हजार ७६९ रुपयांची ६ इंजेक्शन व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. 

दौंड येथील हुतात्मा चौकात अक्षय राजेश सोनवणे (वय २४, रा. गांधी चौक, दौंड), सुरज संजय साबळे (वय २३, रा. शालिमार चौक, दौंड) या दोघांना ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून ३ रेमडेसिविर इंजेक्शन, दोन मोबाईल, दुचाकी असा ९७ हजार ८७९ रुपयाचा माल जप्त केला आहे. 

नारायणगावाजवळील वारुळवाडी येथे रोहन शेखर गणेशकर (वय २९, रा. वाणेवाडी, पो. आपटाळे, ता. जुन्नर) याच्याकडून ३ रेमडेसिविर इंजेक्शन व मोबाईल असा २१ हजार ८९० रुपयांचा माल जप्त केला आहे. 

पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट, सहायक निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक अमोल गोरे, सहायक फौजदार शब्बीर पठाण, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, मुकेश कदम, दत्ता तांबे, सागर चंद्रशेखर, काशिनाथ राजापुरे, दगडु विरकर यांनी ही कामगिरी केली. ........रेमडेसिविर इंजेक्शन बाहेर खरेदी करु नकारेमडेसिविर इंजेक्शन शासनाने अत्यावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला आहे़ त्यामुळे या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकार्‍यांमार्फत थेट हॉस्पिटलला होत आहे. हे इंजेक्शन बाहेर मिळत नाही. तेव्हा रुग्णांच्या नातेवाईकांनी ते बाहेर खरेदी करण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ़ अभिनव देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेdaund-acदौंडnarayangaonनारायणगावmedicineऔषधंCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक