भोसरीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

By Admin | Updated: December 26, 2014 04:53 IST2014-12-26T04:53:23+5:302014-12-26T04:53:23+5:30

बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली. ही कारवाई गुरूवारी पहाटे करण्यात आली. तेजस चंद्रकांत कांबळे (वय २४),

Three arrested in Bhosari weapon | भोसरीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

भोसरीत शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक

पिंपरी : बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी तिघांना अटक केली. ही कारवाई गुरूवारी पहाटे करण्यात आली.
तेजस चंद्रकांत कांबळे (वय २४), प्रतीक प्रकाश तापकीर (२१), गणेश भीमराव बलकवडे (१९, सर्व रा. भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे गस्तीवर असलेल्या पोलिसांना एकाच दुचाकीवरून जात असलेले हे तिघेजण संशयास्पद अवस्थेत आढळले. दुचाकी थांबवून त्यांच्याकडे
चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्तूल, चाकू, कोयता सापडले. तिघांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Three arrested in Bhosari weapon