वाहनचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:14 IST2021-09-06T04:14:51+5:302021-09-06T04:14:51+5:30
पहाटेच्या वेळी ट्रकचालकास अडवून त्यास मारहाण करून ३० हजार रुपये लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी काही तासांत गजाआड केले. सर्फराज ...

वाहनचालकास मारहाण करून लुटणाऱ्या तिघांना अटक
पहाटेच्या वेळी ट्रकचालकास अडवून त्यास मारहाण करून ३० हजार रुपये लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी काही तासांत गजाआड केले.
सर्फराज गऊस शेख (वय २७, रा. पांडे, ता. भोर), ऋषिकेश शंकर चव्हाण (वय १९, रा. शिरवळ तालुका खंडाळा), प्रतीक तुळशिराम कांबळे (वय १७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी चालक अंकुश एकाले याने फिर्याद दिली. एकाले हे पहाटे ४ च्या सुमारास पुण्याहून साताराच्या बाजूस चालला असताना. जुना कात्रज बोगदा ओलांडून आल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ट्रकला अडवून ट्रक चालकास लाकडी दांडक्याने मारहाण करून ट्रकचालकाच्या जवळचे ३० हजार रुपये चोरून नेले.
त्याच सुमारास राजगड पोलीस गस्तीवर असताना रस्त्याच्या कडेला काच फुटलेल्या अवस्थेत उभा असलेला ट्रक त्यांना आढळला. चौकशी केली असता वरील घटना कळल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवली व कात्रज घाट परिसरातुन आरोपींना अटक केली.
फोटो
: आरोपींसह राजगड पोलिसांचे पथक