शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सशस्त्र दरोडाप्रकरणी तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 02:06 IST

अ‍ॅमेझॉन गोडाऊन दरोडा प्रकरण : मारहाण करून तीन लाख अडतीस हजार रुपये व दोन मोबाईल लुटले

विमाननगर : लोहगाव -वाघोली रोड येथील अ‍ॅमेझॉन गोडाऊनवर सशस्त्र दरोडा टाकून रोख रकमेसह सीसीटीव्ही डीव्हीआर व मोबाईलची चोरी करणाऱ्या तिघांना विमानतळ पोलिसांनी शिताफीने अटक केली. सत्यवान उर्फ अप्पा श्रीमंत घाडगे (वय २२, रा. वाघेश्वरनगर वाघोली), निशांत अनिल ननावरे (वय २४ रा. मोहेमदवाडी हडपसर), आकाश अशोक राठोड (वय २३, रा.वागेश्वर नगर-वाघोली) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असून, १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत .

पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार: या गंभीर गुन्ह्याचा तपास करत असताना विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून या तीनही आरोपींना विमानतळ पोलिसांनी शिताफिने अटक केली. अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहायक पोलीस आयुक्त गणेश गावडे, पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गुन्हे निरीक्षक रमेश साळी, तपासपथकाचे प्रमुख उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, पोलीस कर्मचारी अशोक आटोळे, पुष्पेंद्र चव्हाण, विश्वनाथ घोणे, संजय आढारी यांच्या पथकाने या दरोड्याचा तपास लावला.लोहगाव, वाघोली रोड येथे २६ आॅक्टोबर रोजी पहाटे अ‍ॅमेझॉन गोडाऊनवर सशस्त्र चोरट्यांनी दरोडा टाकला होता. या चोरट्यांनी सशस्त्र हत्यारांनी मारहाण करून तेथील तीन लाख अडतीस हजार रुपये रक्कम दोन मोबाईल व सीसीटीव्हीचा डीव्हीआर शिताफीने चोरून नेला होता. या गुन्ह्यातील आरोपींकडून इतरही आणखी गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसRobberyदरोडाamazonअॅमेझॉन