लग्न करावे म्हणून अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST2021-09-05T04:14:35+5:302021-09-05T04:14:35+5:30

पुणे: वारंवार आय लव्ह यू बोलून, तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जाळून टाकण्यात येईल, असे सांगत तिच्या चेहऱ्यावर ...

Threatening to throw acid on a minor girl to get married | लग्न करावे म्हणून अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याची धमकी

लग्न करावे म्हणून अल्पवयीन मुलीवर ॲसिड फेकण्याची धमकी

पुणे: वारंवार आय लव्ह यू बोलून, तू माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुला जाळून टाकण्यात येईल, असे सांगत तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी तो देत होता. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल केला असून, तो सराईत गुन्हेगार आहे.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी मोहम्मद हुसेन खान (४५, रा. सय्यदनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तर मुलीचे शिक्षण ९ वीपर्यंत झाले असून, सध्या ती घरीच असते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ही १६ वर्षांची आहे. ती आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्यास आहेत. त्याने तिच्या घरामध्ये स्वत:च्या मोबाईल नंबरची चिठ्ठी फेकून फोन करायला सांगितले, अन्यथा चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. तसेच तो येता-जाता फिर्यादीला ’आय लव्ह यू’ बोलून तिचा पाठलाग करून घाबरवत होता. तू माझ्याशी लग्न कर नाही, तर तुला जाळून टाकीन, तुझे वय १८ वर्षे होईपर्यंत मी वाट पाहीन, पण माझ्याशीच लग्न कर, अशी धमकी तो तिला सतत देत होता. दरम्यान, सतत होत असलेल्या त्रासाला घाबरून तरुणीने हा प्रकार कुटुंबाच्या कानावर घातला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती ठाकूर करीत आहेत.

---------------------------

Web Title: Threatening to throw acid on a minor girl to get married