शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडी वर्गणीसाठी व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 02:59 IST

खंडणीचा या वर्षीचा पहिला गुन्हा : हडपसर पोलिसांनी केली एकाला अटक

पुणे : दहीहंडी उत्सवाकरिता मागेल तेवढी वर्गणी दिली नाही म्हणून हडपसरमधील एका व्यापाºयास तुझा काटा काढू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत वर्गणी मागणाºयाविरुद्ध हडपसर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका व्यापाºयाने दिलेल्या फिर्यादीवरून विशाल आप्पा मिरेकर (रा. सर्व्हे नं. ५, गाडीतळ, हडपसर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या इतर दोन साथीदारांचा हडपसर पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या समाजकंटकाविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम ३८६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही मंडळांचे कार्यकर्ते व्यापाºयांकडून दहीहंडी उत्सवासाठी जबरदस्तीने वर्गणी गोळा करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक वैजिनाथ पुणे, हवालदार युसूफ पठाण, राजेश नवले, राजू वेगरे आणि सैदोबा भोजराव हे हडपसर येथे पेट्रोलिंग करण्यासाठी गेले. त्यांनी काही व्यापाºयांशी त्यांच्या समस्यांबाबत विचारपूस केली. त्या वेळी बंटर शाळेजवळील दुकानात येऊन आरोपी विशाल मिरेकर आणि इतर दोघे जण उत्सवासाठी २ हजार रुपयांची वर्गणी मागत असल्याची माहिती समोर आली.  आरोपींनी व्यापाºयाकडे २ हजार रुपयांची वर्गणी मागितली होती. त्यावर व्यापाºयाने मला अनेक मंडळांना वर्गणी द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही ३०० रुपये घ्या, अशी विनंती केली. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी त्यांना तुझा काटा काढू असे म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली व १ हजार रुपयांची वर्गणी घेतली. आरोपींनी गेल्या वर्षी देखील हाच प्रकार केला होता. त्यामुळे पोलिसांनी व्यापाºयास विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली....तर नागरिकांनी तक्रार द्यावी४मिरेकरच्या विरोधात आतापर्यंत चार ते पाच निनावी अर्ज आले आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. उत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागत असल्यास त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी, असे आवाहन वानवडी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद पाटील आणि हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिस