शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune | फुकट सिगारेट देण्यासाठी दुकानदाराला धमकावले; तलवार दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 10:16 IST

रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली...

धायरी : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावात एका दुकानदाराकडून फुकट सिगारेट घेण्यासाठी काही सराईतांनी तलवार दाखवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. यातील काही जण सराईत आरोपी असून हवेली पोलिस शोध घेत आहेत. एका महिलेने गाडी हळू चालवा, असे म्हटले म्हणून सराइतांनी संबंधित महिलेलाही मारहाण केली. लहान मुलाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

अधिक माहितीनुसार, गोऱ्हे बुद्रुक येथील माळवाडीत सायंकाळी महिला आपल्या घरासमोर बसली होती. लहान मुले बाहेर खेळत होती. रस्त्यावरून काही तरुण दुचाकीने भरधाव ये-जा करत होते. महिलेने मुले खेळत असल्याने दुचाकीस्वारांना हळू गाडी चालवा, म्हणून सांगितले असता त्याचा राग धरून मारहाण केली. पुन्हा काही वेळाने येत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करू लागले. या घटनेचा व्हिडीओ परिसरात व्हायरल झाला असून संबंधित तरुण सराईत गुन्हेगार आहे. गांजाची नशा करून हे सराईत सातत्याने गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचीही माहिती समोर येत आहे. आरोपींना पकडण्यासाठी दोन पथके रवाना केली आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे हवेली ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी