शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेज टेंडर प्रकरणावरुन पालिकेत जिवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:08 IST

नगरसेविकेच्या विरोधात गुन्हा दाखल...

ठळक मुद्देनगरसेविकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल : ड्रेनेजचे टेंडर प्रकरण

पुणे : टेंडरमध्ये रिंग करीत असताना नेहमीपेक्षा दुसऱ्या ठेकेदारांने टेंडर भरल्याने संतप्त झालेल्या नगरसेविकेच्या पतीने महापालिकेमधील अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार शुक्रवारी घडला़. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे़. या प्रकारामुळे ते व त्यांचा मुलगा दोन तास तेथेच बसून होते़. शेवटी पोलिसांच्या मदतीनंतर ते बाहेर आले़. शिवाजीनगर पोलिसांनी तुषार पाटील, विक्रम खेंगट, राहुल व इतर १५ ते २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़. हा प्रकार पुणे महापालिकेतील दुसऱ्या मजल्यावरील अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या कार्यालयाजवळ २० सप्टेंबरला दुपारी २ वाजता घडला़. याप्रकरणी बलबिरसिंग मंगतसिंग छाबडा (वय ६४, रा़. खेसे पार्क, लोहगाव रोड) यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले, की छाबडा हे ४० वर्षांपासून ठेकेदार असून पुणे शहरातील रोड, ड्रेजेन इत्यादी कामाचे महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट घेत असतात़. महापालिकेच्या ड्रेनेज विभागाचे ३० लाख रुपयांचे टेंडर त्यांनी १८ सप्टेंबर रोजी भरले होते़. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता विक्रम खेंगट याचा त्यांना फोन आला़. तू ड्रेनेज विभागामध्ये टेंडर का टाकले़, तू माझ्या ऑफिसवर ये़ त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही़ दुसºया दिवशी ते व त्यांचा मुलगा रुबलसिंग महापालिकेत गेले होते़. त्यावेळी विक्रम खेंगट याने त्यांच्या मुलाला तुमचे हात-पाय तोडतो, अशी धमकी दिली़. त्यानंतर सायंकाळी छाबडा यांना तुषार पाटील यांनी फोन करून टेंडर काढून घे, म्हणून धमकी दिली़. ............आता काम करून दाखव, तुला जिवे मारूछाबडा व त्यांचा मुलगा रुबलसिंग हे २० सप्टेंबरला दुपारी टेंडरच्या कामासाठी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल यांच्या कार्यालयाजवळ काम करीत होते़. दुपारी २ वाजता अचानक तुषार पाटील, विक्रम खेंगट, राहुल व इतर १५ ते २० साथीदार आले़. ते छाबडा व मुलाला शिवीगाळ करू लागले़. तेव्हा छाबडा यांनी शिव्या का देता, असे विचारल्यावर तू ड्रेनेजचे टेंडर का टाकले़ आता काम करून दाखव, तुला जिवे मारू, अशी धमकी देऊन मारायला धावत आले़. तेव्हा घाबरून ते एका रूममध्ये पळून गेले़, तेव्हा ते रूमबाहेरून त्यांना शिवीगाळ करून धमकावू लागले़. त्यांनी १०० क्रमांकावर पोलिसांना फोन करून मदत मागितली़. पोलीस आल्यानंतर ते तेथेच घाबरून दोन तास बसून होते़ शेवटी ते निघून गेल्याचे समजल्यावर त्या रूममधून बाहेर आले़. ........दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सायंकाळी गुन्हा दाखल करून घेतला असला तरी त्यानंतर त्याचा अद्याप काहीही तपास झालेला नाही़. ............

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपा