शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कौमार्य शस्त्रक्रियेसाठी ‘त्या’ मोजताहेत हजारो रूपये; पुणे-मुंबईत प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 01:13 IST

एकीकडे कौमार्य चाचणीविरोधात कंजारभाट समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र समाजाच्या विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत.

पुणे : एकीकडे कौमार्य चाचणीविरोधात कंजारभाट समाजातील तरूणी आवाज उठवत असताना दुसरीकडे मात्र समाजाच्या विविध वर्गातील तरूणींकडूनच ‘कौमार्य’ पुन:प्राप्तीसाठी हजारो रूपये मोजले जात आहेत. पुणे-मुंबईमध्ये वर्षाला २० ते ३० तरूणी कौमार्य शस्त्रक्रिया करून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.सायकलिंग, व्यायाम आदींमळे पटलाचा पापुद्रा फाटू शकतो. वैद्यकीय तज्ज्ञांनी हे सत्य अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठानेही ‘कौमार्य चाचणी’ अवैज्ञानिक मानत हा विषय अभ्यासक्रमातून वगळला आहे. तरीही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात ‘कौमार्य’विषयीचा दृष्टीकोन बदललेला नाही. कंजारभाट समाजात तरूणींच्या केल्या जाणाऱ्या कौमार्य चाचणीवरून अनेक वादंग उठले. मात्र तरीही मानसिकता बदललेली नाही हे तरूणींकडून कौमार्य पुन:प्राप्तीसाठी केल्या जाणाºया शस्त्रक्रियेवरून अधोरेखित झाले आहे.यासंदर्भात ‘लोकमत’ने कॉस्मॅटिक व प्लास्टिक सर्जन डॉ. पराग सहस्रबुद्धे यांच्याशी संवाद साधला असता तरूणींचा कौमार्य शस्त्रक्रियेकडे कल वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, खरेतर पटलाचा पापुद्रा फाटण्यास अनेक कारणे आहेत. मात्र आजही कौमार्याबददलच्या मानसिकतेत फरक पडलेला नाही. कुणाशीतरी शरीरसंबंध आले आहेत. पण आता माझे दुसºया तरूणाबरोबर लग्न होणार आहे त्यामुळे कौमार्य मला परत हवे आहे, असेही आमच्याकडे येणाºया काही मुलींकडून सांगितले जाते. ते पुन्हा मिळवून देणे शक्य नसले तरी त्या पापुद्राचा काही भाग शिल्लक राहिलेला असतो, तो शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जोडला जाऊ शकतो.ही शस्त्रक्रिया लग्नाच्या ८ ते १० दिवस आधी केली जाते. कारण जे पापुद्रे जोडलेले असतात ते फार काळ टिकत नाहीत. पण तरीही शरीरसंबंधानंतर पापुद्रा फाटला तरी रक्तस्त्राव होईलच हे सांगता येत नाही. मात्र बुरसटलेल्यांकडून आजही कौमार्याचा पुरावा मागितला जात असल्याने तरूणी दबावाखाली येऊन कौमार्य सिद्ध करण्यासाठी धडपड करत आहेत. कौमार्य पुन:प्राप्तीसाठी तरूणी हजारो रूपये मोजायला तयार असल्याचे सहस्रबुद्धे यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे