शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 02:16 IST

राज्यभरात जाळे : वर्ल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे : महिला गट स्थापन करून कापडी पिशव्या बनविण्याचे काम देण्याच्या बहाण्याने सदस्य फीच्या नावाखाली पैसे गोळा करून दिलेल्या मालाचे पैसे न देता वर्ल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेने राज्यभरात हजारो महिलांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. पुण्यातही आतापर्यंत १ हजार महिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे़

कंपनीचा चेअरमन मनीष लोकरस, त्याच्या सहायक जयश्री कोपर्डेकर व सुनीता दास अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़ हा प्रकार जून ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडला आहे़ महिलांनी कामाच्या आशेने ६५१ रुपये भरले; पण तयार केलेल्या पिशव्या कंपनीला पाठविल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे पाहून जयश्री कोपर्डेकर, मनीष लोकरस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. कार्यालयही बंद केल्याने लोकांचा संशय वाढला़कात्रज येथे मनीष लोकरस याने वल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेचे कार्यालय सुरू केले होते़ महिलांना तुम्ही गट स्थापन करा़ आम्ही कागदी व कापडी पिशव्या, अगरबत्ती, मेणबत्ती व द्रोण तयार करण्यासारखे गृहउद्योग सुरू करून देऊ़ कच्चा मालाचा पुरवठा करून व तुमच्या वस्तूही घेऊ असे सांगितले़ सभासद फी म्हणून ६५१ रुपये घेतले. काही महिलांना ‘आमच्याकडे पैसे गुंतवा, तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देतो, आकर्षक व्याज देतो,’ असे सांगून रोख स्वरूपात २० हजार, ३० हजार रुपये घेतले़ त्याची कोणतीही पावती दिलेली नाही़ महिलांच्या एका १५० जणींच्या गटाने प्रत्येकी ६५१ रुपये प्रमाणे ९७ हजार रुपये दिले़ महिलांनी केलेल्या कामाचा पगार न देता व उलट गुंतविलेली अंदाजे १ लाख ६५० रुपये परत न करता महिलांची फसवणूक केली़ गटप्रमुखांना त्याने ‘तुम्ही कच्चा माल तयार करण्यासाठी सुरुवातीला पैसे टाका़ तुम्ही पिशव्या बनविल्या, की त्याच्याबरोबर तुमचे पैसे देतो,’ असे सांगितले होते़ त्याप्रमाणे गटप्रमुख महिलांनी स्वत: पैसे गुंतवून पिशव्या, मेणबत्त्या तयार केल्या़ त्या त्यांनी वर्ल्ड ट्रस्ट डाय मनीच्या कार्यालयात नेऊन दिल्या़; पण त्याचे पैसे त्याने दिले नाही़कर्जत, यावल, कराड येथे गुन्हे४मनीष लोकरस याने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यालये उभारून सुमारे ४५ हजार महिलांकडून ६५१ रुपये सभासद फी म्हणून रोख स्वरूपात गोळा केली आहे़ कर्जत, यावल, कराड येथे आतापर्यंत गुन्हे दाखल केले आहेत़४कर्जत पोलिसांनी यापूर्वी जयश्री कोपर्डेकर यांना अटक केली होती; परंतु त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़ त्यानंतर मुख्य सूत्रधार मनीष लोकरस याला सांगलीतून अटक केली आहे़४न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून त्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी सांगितले़ 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारी