शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

Corona Vaccination: दोन डोस कधी पूर्ण होणार? हजारो पुणेकरांनी लसीचा एकही डोस घेतला नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 20:51 IST

महापालिकेने १२ हजार घरामध्ये लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली असता, येथील ३ हजार ७२९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे.

पुणे : शहरातील एकूण लोकसंख्येमधील पात्र नागरिकांच्या संख्यानिहाय लसीकरणाची टक्केवारी १०० टक्के पूर्ण झाली असली तरी, आजही शहरात स्थायिक असलेल्या हजारो नागरिकांनी लस घेतली नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेने १२ हजार घरामध्ये लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली असता, येथील ३ हजार ७२९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे.     राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन लसीकरणाबाबत माहिती घेऊन लस घेण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आहे. शहरात ८ नाव्हेंबरपासून ही जनजागृती मोहिम करण्यात आली आहे. यामध्ये आजपर्यंत १२ हजार ४५ घरांना भेटी दिल्या असता, या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या एकूण व्यक्तींपैकी व १८ वर्षांपुढील ३ हजार ७२९ पात्र व्यक्तींनी अद्यापही लस घेतलेली नसल्याचे समोर आले आहे. तसेच ९ हजार ५८७ जणांचा लसीचा दुसरा डोस बाकी असल्याचे आढळून आले असून, यामध्ये काही जणांचा ८४ दिवसांचा निर्धारित काळ पूर्ण झाला असला तरी त्यांनी लस घेण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे दिसून आले आहे. 

कोरोना संसर्गावर पूर्णपणे मात करण्याच्या टप्प्यावर पुणे शहर असताना, लस न घेणाऱ्यांची ही हजारोंमधील संख्या शहराच्या आरोग्यासाठी खेदाची बाब ठरत आहे. शहरात शंभर टक्के नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालेला असताना, लस न घेणाऱ्यांची संख्या पाहता पुणे शहराबाहेरील अनेकांनी शहरात येऊन लस घेतली असल्याचे स्पष्ट करीत आहे. यामुळे शहरातील घराघरात पोहचून लस घेतलेल्यांची माहिती संंकलित करून, त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त करणे हे आरोग्य विभागासमोर आता मोठे आव्हान आहे.  महापालिकेच्यावतीने शहरात सुरू असलेल्या या मोहिमेत सध्या हडपसर व वारजे क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत लसीचा एकही डोस न घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे या जनजागृती मोहिमेत दिसून आले आहे.  ''शहरात ज्या भागात लसीकरण कमी झाले आहे, अशा ठिकाणी घरा-घरापर्यंत पोहचून प्रत्येक पात्र व्यक्तीने लस घेतली आहे का याची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांनी लस घेतली नाही त्यांना जवळच्या केंद्रांवर लस घेण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे असे लसीकरण अधिकारी महापालिका डॉ. सुर्यकांत देवकर यांनी सांगितले आहे.''  

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टर