शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लेन तोडल्याने पुणे एक्स्प्रेसवेवर १५ हजार वाहनचालकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:50 IST

द्रुतगती महामार्गावर खंडाळा येथे वेगाने जाणा-या वाहनांवर स्पीडगनद्वारे कारवाई केली जाते.

पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात संचेती हॉस्पिटलमधील डॉ़ केतन खुर्जेकर यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, महामार्ग पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात द्रुतगती महामार्गावर १५ हजार मोटारी व अवजड वाहनांवर लेन कटिंग केल्याबद्दल कारवाई केली आहे.या वर्षी जानेवारी ते आॅगस्ट दरम्यान पुणे विभागात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७४ हजार १४६ वाहनांवरकारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ कोटी ३८ लाख २१ हजार ७०० रुपये दंड वसूल केला आहे, असे वाहतूक महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी सांगितले.महामार्गावरील व शहरांतील मार्गांवरून वेगाने गेल्याने होणा-या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांना इंटरसेप्टर व्हेइकल देण्यात आली आहेत. राज्यातील पोलिसांना सध्या अशी ९६ वाहने देण्यात येणार असून, शनिवारी त्यातील काही वाहनांचे वितरण पुण्यातील पोलीस संशोधन केंद्रात पोलीस आयुक्त डॉ़ व्यंकटेशम यांच्या हस्ते करण्यात आले.अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विजय पाटील यांनी सांगितले, २०१८ मध्ये राज्यात रस्ते अपघातात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू झाला असून, २० हजार जण गंभीर जखमी झाले आहेत़ एकूण ३९ टक्के अपघात हेल्मेट नसल्यामुळे झाले असून,३० टक्के अपघात अतिवेगाने किंवा बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे झालेले आहेत. सीट बेल्ट न लावल्यामुळे १३ टक्के अपघात झाले आहेत.स्पीडगनचाही वापरद्रुतगती महामार्गावर खंडाळा येथे वेगाने जाणा-या वाहनांवर स्पीडगनद्वारे कारवाई केली जाते. या अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी डावीकडून भरधाव वेगाने ओव्हरटेक करणा-या व लेन कटिंग करणा-या वाहनांविरोधात मोहीम हाती घेतली होती. त्यात १ ते ३० सप्टेंबर दरम्यान कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Mumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे