हजारो भाविकांनी घेतले मयुरेश्वराचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:30 IST2020-12-04T04:30:56+5:302020-12-04T04:30:56+5:30

आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता गुरव मंडळीचि प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. ...

Thousands of devotees visited Mayureshwar | हजारो भाविकांनी घेतले मयुरेश्वराचे दर्शन

हजारो भाविकांनी घेतले मयुरेश्वराचे दर्शन

आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने पहाटे पाच वाजता गुरव मंडळीचि प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर मंदिराचा मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला. यानंतर तालुक्यासह राज्यभरातील भावीकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. सोशल डिस्टन्स, तोंडावर मास्क, हातावर सॅनिटायझर व शारीरिक तापमानाची नोंद घेऊनच भक्तांना मंदिरात सोडले जात होते. सकाळी ७ वाजता पुन्हा श्रींची धुपारती निघाली. दुपारी १२ वाजता नैवद्य दाखविण्यात आला . पुणे , सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यातुन भावीक दर्शनासाठी आले होते. चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने आजची होणारी गर्दी लक्षात घेता पिण्यासाठी पाणी, सुरक्षा रक्षक , सफाई कामगार आदी सोय उपलब्ध केली होती. राज्य शासनाने दिलेल्या अटी व नियमांचे पालन करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, १० वशार्खालील मुले व गरोदर मातांना मंदिरात दर्शनासाठी जाण्यास नाकारण्यात आले आहे. पायरीवरुनच दर्शन घेण्यास सांगित येत होते.

Web Title: Thousands of devotees visited Mayureshwar