शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्यांना दणका; समज देऊनही न ऐकल्यास थेट कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 10:46 IST

रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५६ अंतर्गत रेल्वे गाडीच्या छतावर, इंजिनवर, पायऱ्यांवर किंवा दरवाजांवर प्रवास करणे सक्त मनाई आहे

पुणे : रेल्वेतून प्रवास करताना जागा न मिळाल्याने काही प्रवासी दरवाजात उभे राहून प्रवास करतात. अशा लटकत अथवा पायऱ्यांवर बसून प्रवास करणाऱ्यांवर पुणेरेल्वे विभागाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, १०५ जणांवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

मुंबईमध्ये काही दिवसांपूर्वी लोकलमधून लटकत प्रवास करीत असताना खाली पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने धोकादायक प्रवास रोखण्यासाठी ११ ते २५ जूनदरम्यान एक विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये दरवाजात उभे राहून अथवा लटकत प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाईत १०५ प्रवासी धोकादायक पद्धतीने प्रवास करताना आढळून आले.

तीन महिने कारवास 

 रेल्वे कायदा १९८९ च्या कलम १५६ अंतर्गत रेल्वे गाडीच्या छतावर, इंजिनवर, पायऱ्यांवर किंवा दरवाजांवर प्रवास करणे सक्त मनाई आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी समज देऊनही जर एखादी व्यक्ती अशा प्रतिबंधित ठिकाणी प्रवास करीत राहिली, तर त्या व्यक्तींवर कारवाई करून त्यास ५०० रुपयांच्या दंडाची अथवा तीन महिन्यांपर्यंत कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात आहे.

पुणे रेल्वे विभाग प्रवाशांच्या सुरक्षेची कटिबद्धता आहे. पायऱ्यांवर प्रवास करणे ही अत्यंत धोकादायक सवय आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येतील. नागरिकांनी दरवाजात बसून अथवा लटकत प्रवास करू नये. सुरक्षित प्रवासाच्या नियमांचे पालन करावे. - हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, पुणे रेल्वे विभाग

टॅग्स :Puneपुणेpune railway stationपुणे रेल्वे स्थानकpassengerप्रवासीrailwayरेल्वेticketतिकिट