शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
4
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
7
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
10
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
11
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
12
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
13
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
14
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
15
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
16
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
17
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
18
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
19
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
20
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा

'वसंतदादांचे सरकार मी पाडले', शरद पवारांची पहिल्यांदाच जाहीर कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 21:11 IST

राजकीय संस्कृती बिघडली असल्याची व्यक्त केली खंत

पुणे: संसदेचे अधिवेशन सुरू होऊन १४ दिवस झाले, मात्र एक मिनिटही कामकाज चालले नाही. ही स्थिती चिंताजनक आहे. देशाची एकता लोकशाही टिकवायची असेल तर महात्मा गांधी नेहरू यांचा विचार मानणाऱ्यांनी एकत्र यायला हवे असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. देशभरातील ३०० खासदार एकत्र येऊन मोर्चा काढतात, तर त्यांना अटक केली जाते असे ते म्हणाले.काँग्रेसचे नेते, माजी आमदार उल्हास पवार यांच्या सहस्रचंद्र दर्शन कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते उल्हास पवार यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सॅटर्डे क्लबच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला माजी मंत्री बाळासाहेब थोरात, पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ औसेकर, माजी आमदार धीरज देशमुख, साहित्यिका डॉ. अरूणा ढेरे उपस्थित होते. पवार यांच्या पत्नी अनुराधा पवार यांचा डॉ. ढेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शरद पवार यांनी यावेळी जुन्या राजकीय वातावरणाच्या आठवणी जागवल्या व सद्य राजकीय स्थितीबद्दल चिंता व्यक्त केला. सत्कारमुर्ती उल्हास पवार यांनीही त्याला दुजोरा देत सध्याच्या राजकारणाने व राजकीय व्यक्तींनीही पातळी सोडली असल्याची टिका केली.

वसंतदादांचे सरकार मी पाडले

शरद पवार यांनी सांगितले की, ज्यांनी देशाचे नेतृत्व केले, घरादाराचा विचार केला नाही, पंचशील सारखे तत्व जगाला दिले, त्यांचे नावही घेतले जात नाही. हे सगळे अस्वस्थ करणारे आहे. ज्या वसंतदादा यांचे सरकार मी पाडले, त्याच दादांनी पुढे १० वर्षांनंतर पक्षात नेतृत्वाचा विचार आला त्यावेळी माझे नाव घेतले. असा विचार करणारे नेते होते. आता द्वेषाचे, सुडाचे राजकारण केले जाते.माजी मंत्री थोरात म्हणाले, “लोकांच्या मनातील आदराचे स्थान अढळपदासारखे टिकवणे ही अवघड गोष्ट उल्हास पवार यांनी केली आहे.” धीरज देशमुख यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व उल्हास पवार यांच्यातील मैत्रीचे बंध उलगडून दाखवले. औसेकर यांनी पवार यांच्या वारकरी असण्याचे संदर्भ दिले तर डॉ. ढेरे यांनी पवार यांच्या रसिकतेचे दाखल देत, आनंद लुटणारा व तो लुटवू देणारा असे पवार असल्याचे सांगितले. प्रा. मिलिंद जोशी लिखित मानपत्राचे डॉ. सतीश देसाई यांनी वाचन केले.

सत्काराला उत्तर देताना उल्हास पवार यांनी शरद पवार यांच्या भाषणातील राजकीय संस्कृती बिघडली असल्याचे जूनीनवी उदाहरणे देत स्पष्ट केले. तरीही गांधी नेहरू यांनी दाखवलेली वाट असल्याने देशाला १०० टक्के आशा आहे असेही दोन्ही पवार यांनी नमुद केले. अंकूश काकडे यांनी प्रास्तविक केले. श्रीकांत शिरोळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी खासदार अशोक मोहोळ, आमदार बापू पठारे, निवेदन सुधीर गाडगीळ तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.यशवंतराव चव्हाणांसमोर प्रथमच भाषण केले. चव्हाण यांनी त्याचे जाहीर कौतुक केले व नंतर हळुच सांगितले वैयक्तिक टीका कधीही करायची नाही. हा संस्कार आहे. आता पीएचडी झालेल्यांची सभागृहातील भाषणे म्हणजे चक्क शिव्या असतात, त्या ऐकल्या तेव्हापासून पीएचडी करणाऱ्यांची भीतीच वाचायला लागली असे उल्हास पवार यांनी सांगताच सभागृहात हास्यकल्लोळ झाला.