शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

'दोनशे' च्यावर सूर्यग्रहणांना नजरकैद करणाऱ्या ' त्या ' आजीबाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 17:02 IST

१९६१ सालापासून म्हणजेच अकरा वर्षांची असताना सूर्यग्रहणाबद्दल कळू लागले...

ठळक मुद्दे बऱ्याच प्रतीक्षेनंतर सूर्यग्रहण दिसले तरी नागरिकांनी ते पाहण्याचा मनमुराद लुटला आनंद बालगंधर्व पुलावर नागरिकांची गर्दी

अतुल चिंचली -  

पुणे: माझ्या लहानपणापासून खग्रास आणि खंडग्रास ग्रहणे पाहण्याची आवड होती. तसेच वडीलधारी मंडळी व शालेय शिक्षकांकडून ग्रहणाबद्दल मिळणाऱ्या माहितीने त्या विषयीची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. त्याकाळचं अजून एक वैशिष्टये म्हणजे लहान असताना ग्रहणाच्यावेळी दान मागणारी लोकं येत होती. मात्र हल्ली ती नजरेला पडत नाही.. वर्षातून अनेकवेळा सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण दिसतात. माझ्या वडिलांनी लावलेल्या सवयीमुळेच लहानपणापासूनच सूर्यग्रहण पाहत आले आहे. त्यामुळे आतापर्यंत जवळपास दोनशेपेक्षा जास्त सूर्यग्रहण माझ्या पाहण्यात आली आहेत, असा अनुभव ज्येष्ठ महिला सुमन सुकाळे यांनी ‘लोकमत’ ला सांगितला.       गुरुवारी सकाळी पुण्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले. यासाठी बालगंधर्व पुलावर नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठांचा सहभाग दिसून आला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर सूर्यग्रहण दिसले तरी नागरिकांनी ते पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला. सुमन सुकाळे यांचा जन्म १९५२ साली झाला. आता त्यांचे वय ६७ आहे. लहानपणापासूनच त्या वडिलांसोबत सूर्यग्रहण पाहायला जात असे. सुकाळे म्हणाल्या, आम्ही लहान असताना वडील आवडीने सूर्यग्रहण बघायला घेऊन जात असे. पण १९६१ सालापासून म्हणजेच अकरा वर्षांची असताना सूर्यग्रहणबद्दल कळू लागले. तेव्हा चष्मा घालून सूर्यग्रहण पाहा. अशी जनजागृती केली जात नव्हती. म्हणून बहुतेक लोकांना त्रासही होत असे. आता मात्र वृत्तपत्रे, अनेक  संस्था याबाबत माहिती देतात. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याकाळात खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळत असे. शालेय अभ्यासक्रमापेक्षा वडीलधाऱ्या माणसांककडून सूर्यग्रहण म्हणजे काय. हे सांगितले जात होते. आम्ही लहान असताना सूर्यग्रहणाच्या वेळी दान मागणारी लोक येत होती. त्यांना ग्रहणाच्या एका दिवसात भरभरून दान मिळत होते. प्रत्येक नागरिक त्यांना पैसे किंवा इतर गोष्टी देत होते. आता मात्र ती लोक अजिबात दिसत नाहीत. ग्रहणाच्या वेळी दान मागणाऱ्या लोकांचे वेगळेपण होते. एवढ्या वर्षात १९८० साली सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण दिसले होते. ते अजूनही लोकांच्या लक्षात आहे. आतापर्यंत तसे सूर्यग्रहण दिसले नाही. पूर्वी सूर्यग्रहणाच्या वेळी शक्यतो ढगाळ वातावरण आढळत नसे. परंतु वातावरणातील बदलामुळे या सूर्यग्रहण पाहणे अवघड होतं चालले आहे. ज्येष्ठांपेक्षा लहान मुलांनी आणि तरुणांनी अशा भौगोलिक गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.........

टॅग्स :Puneपुणेsurya grahanसूर्यग्रहण