थोरात सरांसाठी- जोड , महिला डॉक्टरांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:11 IST2021-09-19T04:11:08+5:302021-09-19T04:11:08+5:30
७. डॉ धनश्री वायाळ: अनेक महिलांवर अथवा मुलींवर घरातच अत्याचार होतो. ते सांगण्यासाठी त्या पुढे येत नाही. आपली वा ...

थोरात सरांसाठी- जोड , महिला डॉक्टरांच्या प्रतिक्रिया
७. डॉ धनश्री वायाळ: अनेक महिलांवर अथवा मुलींवर घरातच अत्याचार होतो. ते सांगण्यासाठी त्या पुढे येत नाही. आपली वा कुटुंबाची बदनामी होईल, ही त्यांना भीती असते. तेव्हा महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन अशा घटनेतील महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अथवा त्यांना न्याय देण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. त्यासाठी महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन त्यांनी फोरम तयार केला पाहिजे.
८. डॉ राजश्री काकडे :
आजही काही भागांत लहान वयातच मुलींचे लग्न होतात. त्यांचे शिक्षणदेखील अर्धवट राहतात. मुलींच्या शिक्षणाविषयी असलेली उदासीनता दूर झाली पाहिजे. मुलींच्या आरोग्यविषयीच्या तक्रारीदेखील वाढत चालल्या आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचादेखील प्रश्न सुटला पाहिजे. महिलांचे सशक्तीकरण केवळ शहरी भागापुरतेच मर्यादित न रहाता ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचले पाहिजे.
९. डॉ नीता माने :
महिला आणि बालिकांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना काही मदत करता येते का, हे पाहिले पाहिजे. त्यांना शाळेत सुरक्षित वातावरणात जाता आलं पाहिजे. त्यांना शाळेच्या ठिकाणी व कामाच्या ठिकाणीदेखील संरक्षण मिळाले पाहिजे.