शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

यंदा उन्हाचा चटका अधिक जाणवणार; फेब्रुवारीमध्येच तापमानाची पस्तीशी पार  

By श्रीकिशन काळे | Updated: February 20, 2025 16:23 IST

यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

पुणे : सध्या पुणे शहरात दुपारचे तापमान चांगलेच तापू लागले असून, पुणेकरांना त्याचा चटका आताच सहन होत नाही. कमाल तापमान ३५ अंशाच्या वर पोचले असून, सकाळी आणि रात्री मात्र किमान तापमानात घट पहायला मिळत आहे. यंदाचा उन्हाळा अधिक कडक राहणार असल्याचा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.शहरामध्ये काही भागामध्ये प्रचंड उष्णता जाणवते तर दुसऱ्या भागात कमी असते. त्यामुळे शहरातील तापमानाचे संतुलन बिघडले आहे. शहरातील बांधकामे, वाढलेली वाहने, मोठ-मोठ्या कंपन्यांमधील एसी आदी गोष्टींमुळे उष्णता वाढत आहे. तसेच हवामानातही बदल होत असून, त्यामुळेच जानेवारीमध्ये उष्णता जाणवत होती. आता फेब्रुवारी महिन्यात देखील हवेच्या वरच्या थरामध्ये उच्च दाबाचे पट्टे तयार झाले आहेत. त्यात उत्तरेकडून थंड वारे वाहत असून, त्याचा परिणाम म्हणून उष्णता वाढल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यामध्ये वातावरणातील मध्यम थरातील उच्च दाब तयार होतो. त्यामुळे उष्णता अधिक निर्माण होते. पण तसाच प्रकार आता तयार झाल्याने पुणे तापत आहे. परिणामी यंदा फेब्रुवारीमध्येच विक्रमी उष्णतेची नोंद झाली.शहराचे तापमान हे शिवाजीनगर भागाचे जे असेल ते समजले जाते. त्यामुळे यंदा जानेवारीत शिवाजीनगरचे तापमान ३० ते ३२ अंशावर, तर फेब्रुवारीत ३४ ते ३५ अंशांच्या वर नोंदवले जात आहे. त्यातही शहरातील वडगावशेरी, कोरेगाव पार्क हा भाग सर्वात अधिक उष्णतेचे होत आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये या भागात सर्वाधिक तापमानाची नोंद पहायला मिळत आहे. कोरेगाव पार्क हॉटशहरातील सर्वात अधिक झाडी असणारा आणि थंड असणारा परिसर म्हणून कोरेगाव पार्कचा नावलौकिक होता. पण गेल्या तीन वर्षांपासून हा नावलौकिक कमी झाला आहे. तर सर्वाधिक हॉट भाग म्हणून कोरेगाव पार्क ठरत आहे. शिवाजीनगरचे फेब्रुवारीतील तापमान२०२५ : ३४.४२०२४ : ३३.५१२०२३ : ३२.७६२०२२ : ३२.२२०२१ : ३२.३२०२० : ३१.३१पाच वर्षांत पाच अंशाने वाढ !गेल्या पाच वर्षांमध्ये शिवाजीनगरचे फेब्रुवारी महिन्यातील कमाल तापमान हे सातत्याने वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. २०२० मध्ये शिवाजीनगरचे फेब्रुवारीमधील कमाल तापमान हे ३१ अंशावर होते, तेच आता ३५ अंशांच्या वर गेल्याचे पहायला मिळत आहे.

पुण्यातच नव्हे तर सर्वत्र वातावरणातील उष्णता वाढत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा हा अधिक चटका देणारा असणार आहे. जानेवारीतच उन्हाळा सुरू झाल्याचे अनुभवायला मिळाले. फेब्रुवारीमध्ये कमाल तापमान वाढत असल्याने हा महिना उष्ण ठरत आहे. -डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

गेल्या काही दिवसांतील किमान तापमान२० फेब्रुवारी : १४.७१९ फेब्रुवारी : १४.९१८ फेब्रुवारी : १५.११७ फेब्रुवारी : १२.९१६ फेब्रुवारी : १२.८१५ फेब्रुवारी : १३.४

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडweatherहवामानSummer Specialसमर स्पेशल