शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचे साहित्य संमेलन गैरसोयीचे असणार नाही! उषा तांबे यांनी दिली ग्वाही

By श्रीकिशन काळे | Updated: June 25, 2023 17:13 IST

महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांसाठी संमेलनात आंतरभारती नावाने कार्यक्रम घेण्यात येणार

पुणे : गतवर्षी संमेलनात प्रकाशकांची गैरसोय झाली होती. पण यंदा आम्ही खास सोय करत आहोत. एका प्रकाशकाचा सत्कारही करत आहोत. गेल्या वर्षीच्या गैरसोयी यंदा आम्ही सुधारत आहोत. यंदा गाळे कमी केले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन करताना सोपे जाईल, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची निवड रविवारी पुण्यात करण्यात आली. त्या वेळी तांबे या पत्रकारांशी बोलत होत्या. यंदा सोयींसाठी खास व्यवस्था असणार आहे. स्वच्छतागृहे, जेवण, पाणी अशी सर्व सोयी असतील. सर्व खबरदारी असणार आहे. गतवर्षी प्रकाशकांची गैरसोय झाली हे आम्ही मान्य करतो. ग्रंथ प्रदर्शनात गाळे गोलाकार न करता समोरासमोर ठेवण्यात येतील. सर्वांना ते सोपे जाईल. महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांसाठी संमेलनात आंतरभारती नावाने कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्यांनाही सामावून घेण्यात येईल, असेही त्या बोलल्या.

अभिजात दर्जासाठी सर्वांनी एकत्र यावे 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी महामंडळ सातत्याने प्रयत्न करत आहोत. नागरिक व सर्वांनी मिळून अभिजात दर्जासाठी प्रयत्न करायला हवेत. तसेच यंदा संमेलन उद‌्घाटनाला इतर भाषेतील उद‌्घाटक बोलवणार नाही. आपल्याच भाषेतील उद‌्घाटन आणावेत, असा विचार आहे. पण सर्व बाजूने विचार करण्यात येईल.

खर्च कोण करते ?

शासनाने आम्हाला प्रश्न विचारला आहे की, तुम्हाला २ कोटी द्यायचे झाले तर तुम्ही किती गोळा करणार ? आम्ही पैसे गोळा करत नाहीत. खर्च हा निमंत्रक संस्था करते. सरकार अनुदान देते. त्यातून खर्च होतो. एकूण संमेलनाचा खर्च किती होणार, याविषयी आम्ही सरकारला अंदाज दिला आहे. संमेलनाचा खर्च हा आयोजक प्रतिनिधी शुल्क त्यात जेवणखाणं, जाहिरात खर्च यातून सर्व संमेलनाचा खर्च होतो. स्मरणिकेसाठी खर्च होतो.

राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप  

राजकीय व्यक्तींना संमेलनाला बोलावले जाते. यंदा त्याविषयी काय नियोजन केले आहे, यावर तांबे म्हणाल्या, राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप होतोच. राजकीय व्यक्तींनाही संमेलन महत्त्वाचे वाटते. त्यामुळे त्याला आम्ही काही करता येत नाही. एकच व्यक्ती १७ संमेलनाच्या उद‌्घाटनाप्रसंगी उपस्थित झालेला आहे. याला काही करता येत नाही, अशी खंत तांबे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणेakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळcultureसांस्कृतिकartकलाGovernmentसरकारmusicसंगीत