शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

Mahesh Kale: यंदाचा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार गायक पं. महेश काळे यांना जाहीर

By श्रीकिशन काळे | Updated: July 5, 2024 15:55 IST

बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५.०० वाजता होणाऱ्या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर-न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार

पुणेः बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे दिला जाणारा बालगंधर्व गुणगौरव पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध गायक पं. महेश काळे यांना देण्यात येणार आहे. रोख रूपये एक लाख ११ हजार १११ आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर यंदाचा कोहिनूर गंधर्व पुरस्कार बंगलोरचे संगणक अभियंता व संगीत रंगभूमीवरील गायक -अभिनेता सुकृत ताम्हनकर यांना दिला जाणार आहे. रोख रूपये ५१ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोमवार दिनांक १५ जुलै २०२४ रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे अध्यक्ष  सुरेश साखवळकर आणि कार्याध्यक्ष नाना कुलकर्णी यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविली आहे.                                      बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी ५.०० वाजता होणाऱ्या सोहळ्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर-न्यायाधीश न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, उद्योगपती श्रीधर प्रभू आणि नामवंत सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात यंदाचा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार गोव्याचे महादेव हरमलकर यांना देण्यात येणार असून रूपये १५ हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर भास्करबुवा बखले पुरस्कार गोव्याचे शिवानंद दाभोळकर यांना, गो. ब. देवल पुरस्कार पुण्याच्या दीप्ती भोगले यांना, काकासाहेब खाडिलकर पुरस्कार पुण्याचे निनाद जाधव यांना, डॉ. सावळो केणी पुरस्कार तळेगाव दाभाडेचे केदार कुलकर्णी यांना आणि खाऊवाले पाटणकर पुरस्कार ठाण्याचे सुधीर ठाकूर यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी १० हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.याच समारंभात सांगलीच्या धनश्री फडके आणि चिपळूणचे राजाभाऊ शेंबेकर यांना रंगसेवा पुरस्काराने तर पुण्याचे अभय जबडे आणि  माधुरी आंबेकर यांना द. कृ. लेले पुरस्काराने, तर मुंबईची कु. तन्वी गोरे हिला लक्ष्मीबाई पंडित पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रत्येकी रूपये पाच हजार आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.

यावेळी स्मरणिका प्रकाशनानंतर 'गंधर्वरंग' ही नाट्य संगीताची मैफल होणार असून त्यात पं. महेश काळे, बकुल पंडित, मंजिरी कर्वे आलेगावकर, निनाद जाधव, राजाभाऊ शेंबेकर, तन्वी गोरे, सुकृत ताम्हनकर, धनश्री फडके, रवींद्र कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर हे कलाकार सहभागी होणार आहेत. त्यांना ऑर्गनवर संजय गोगटे, शिवानंद दाभोलकर, तबल्यावर केदार कुलकर्णी आणि विद्यानंद देशपांडे तर व्हायोलिनवर प्रज्ञा शेवडे साथसंगत करणार आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे. तसेच बालगंधर्व संगीत रसिक मंडळातर्फे मंगळवार दिनांक १६ जुलै रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आणि आषाढी एकादशीनिमित्त बुधवार दिनांक  १७ जुलै रोजी भरत नाट्य मंदिरात 'कान्होपात्रा' नाटकाचे प्रयोग सादर केले जाणार असून रसिकांना त्याचा विनामूल्य  लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMahesh Kaleमहेश काळेSocialसामाजिकBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरmusicसंगीत