शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

...हा त्रास १० लाख लोकांमध्ये एकाला होतो" अजित पवारांनी सांगितला ‘त्या’ प्रसंगाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 14:24 IST

विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील काही वर्षांपुर्वी डोळ्याच्या रेटीनोचा आजार झाला होता

बारामती : विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील काही वर्षांपुर्वी डोळ्याच्या रेटीनोचा आजार झाला होता. त्यावर डॉ.तात्याराव लहाने यांनी शस्त्रक्रिया करुन उपचार केले.हा आजार १० लाख लोकांमध्ये एकाला होत असल्याचे देखील यावेळी पवार यांनी सांगितले. बारामती येथील ऐन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीयाच्या  मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरात पवार यांनी हा किस्सा सांगितला.

यावेळी पवार म्हणाले, कधी कोणता प्रसंग कोणाच्या वाट्याला येईल, ते सांगता येत नाही. मागे मी एकदा परदेशात गेलो होतो.त्यावेळी परदेशात माझ्या डोळ्याला काहीतरी झाल्याचे जाणवले. मुंबईत मंत्रालयात असताना देखील डोळ्याचा त्रास जाणवला, त्यानंतर मी तातडीने डॉ.तात्याराव लहाने यांच्याकडे गेलो. डॉ. लहाने यांनी बॅटरीचा वापर करुन तातडीने डोळ्याची तपासणी केली. माझ्या डोळ्यातील रेटीनोला ‘प्रॉब्लेम’ झाल्याचे पवार त्यांनी सांगितले. त्या रेटीनोला लेजरने बांध घालून उपचार करण्यास त्यांनी सुचवले. त्यानंतर तातडीने डॉ.लहाने यांनी माझ्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली. हा आजार नेमका काय आहे, याची माहिती डॉ.लहाने यांना विचारली. त्यावर त्यांनी हा त्रास १० लाख लोकांमध्ये एकाला होतो, असे सांगितल्याची आठवण पवार यांनी या वेळी शिबीरात सांगितली.

यावेळी अजित पवार यांनी डॉ लहाने यांचे आरोग्य क्षेत्रात मोठे काम असल्याचे कौतुक केले. डॉ.लहाने यांना त्यांच्या कामामुळे खासदारकीची भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ऑफर दिली होती. मात्र, माझा तो पिंड नसल्याचे सांगत डॉ.लहाने यांनी त्यास नकार दिला. यामध्ये त्यांना त्रास झाला, याचा मी साक्षीदार आहे. केवळ त्यांचे चांगले काम असल्याने त्या प्रसंगातून डॉ. लहाने बाहेर पडल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल