तीस लाखांची फसवणूक

By Admin | Updated: October 11, 2016 02:13 IST2016-10-11T02:13:02+5:302016-10-11T02:13:02+5:30

टेक महिंद्रा आणि आयबीएम या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोबाईल द्यायची बतावणी करीत दुकानदाराकडून महागडे ४५ मोबाईल घेऊन

Thirty lakh fraud | तीस लाखांची फसवणूक

तीस लाखांची फसवणूक

पुणे : टेक महिंद्रा आणि आयबीएम या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना मोबाईल द्यायची बतावणी करीत दुकानदाराकडून महागडे ४५ मोबाईल घेऊन त्यांची ३० लाख ६० हजार ४५ रुपयांची फसवणूक करण्यात आली.
संभव खन्ना (रा. नवी दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी दिनेश मोहनलाल गुप्ता (वय ४२, रा. वानवडी) यांनी फिर्याद दिली आहे. खन्ना याने टेक महिंद्रा कंपनीमध्ये नोकरी करीत असताना, गुप्ता यांच्याकडून काही वेळा मोबाईल नेले होते. त्यामधूनच त्यांची ओळख झाली होती. गुप्ता यांच्या दुकानामध्ये १३ आॅगस्ट रोजी आलेल्या खन्ना याने टेक महिंद्रा कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी काही मोबाईल हवे असल्याचे सांगितले होते. बिल देतो, असे सांगून तो पसार झाला.

Web Title: Thirty lakh fraud