स्पायडर स्पोर्ट्स संघाचा तिसरा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:24+5:302021-03-09T04:11:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कर्मा ९ स्पोर्ट्स यांच्या तर्फे व रेडबुल यांच्या सहकार्याने आयोजित कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट ...

स्पायडर स्पोर्ट्स संघाचा तिसरा विजय
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कर्मा ९ स्पोर्ट्स यांच्या तर्फे व रेडबुल यांच्या सहकार्याने आयोजित कर्मा ९ टी-२० कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत स्पायडर स्पोर्ट्स संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत तिसरा विजय नोंदविला.
लिजेंड्स क्रिकेट मैदानात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यात सागर मापूस्करच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर स्पायडर स्पोर्ट्स संघाने टायटन्स संघाचा ५७ धावांनी पराभव करत तिसरा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात शशी बाहीरच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर जीबीजी-गुड, बॅड अँड गुगली संघाने अयोध्या वॉरियर्स संघाचा चार गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : साखळी फेरी :
अयोध्या वॉरियर्स : २० षटकात ९ बाद १३२ धावा, गिरीश कोंडे ३७, प्रणव नातू ३३, शंतनू गांधी ११, बादल बैद्य २-२१, शशी बाहीर २-२२, गिरीश वीज १-९, हरीश केआर १-१७ पराभूत वि.जीबीजी-गुड, बॅड अँड गुगली : १८.५ षटकात ६ बाद १३५ धावा, मातंग सुर्ती नाबाद ४५, हरीश केआर २४, शशी बाहीर १३, रणजीत करथा १०, सचिन कांगरकर ३-७, अमित उमरीकर २-४३ ; सामनावीर - शशी बाहीर; जीबीजी-गुड, बॅड अँड गुगली संघ ४ गडी राखून विजयी;
स्पायडर स्पोर्ट्स : २० षटकात ४ बाद १४८ धावा, चांदेर कांत ठाकूर ५४, सागर मापूस्कर नाबाद ५६, मिकदाद सय्यद १३, पंकज गोपलानी १-२२, विजय धर्मानी १-२३ वि.वि.टायटन्स : १९.५ षटकात ९ बाद ९१ धावा, प्रकाश करिया २६, राहुल शर्मा १६, पंकज गोपलानी १४, रोहन पिसाळ ३-१०, समीर सिंग २-१७, धीरज द्विवेदी २-२५; सामनावीर - सागर मापूस्कर; स्पायडर स्पोर्ट्स संघ ५७ धावांनी विजयी.