शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोच्या भुयारी मार्गाचे तिसरे टीबीएम लवकरच पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 19:42 IST

या जागेत चार बोगद्यांचे जाणाऱ्या व येणाऱ्या अशा दोन मेट्रोंसाठी सलग असे दोन बोगदे

ठळक मुद्देमहामेट्रोचे नियोजन :एप्रिलमध्ये स्वारगेटजवळून खोदाईसाधा जिना, सरकता जिना व लिफ्ट अशा तीनही सुविधा याठिकाणी असणा

पुणे: महामेट्रोच्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाच्या खोदाईसाठीचे तिसरे टनेल बोअरिंग मशिन(टीबीएम) लवकरच पुण्यात येत आहे. हॉँगकॉँगहून ते बोटीने मुंबईत व तिथून मालमोटारीने लवकरच पुण्यात येईल. स्वारगेटपासून पुढे मंडईकडे या टीबीएमने बोगद्याची खोदाई सुरू होईल.एकूण ४ टीबीएम वापरून हे दोन बोगदे तयार करण्यात येत आहेत. कृषी महाविद्यालयाकडून दोन बोगद्याची खोदाई सुरू झाली आहे. त्यातील एक बोगदा ३०० मीटरपेक्षा पुढे गेला आहे. दुसरा बोगदाही १५० मीटर खोदून झाला आहे. १०० फूट लांबीच्या दोन टीबीएमने हे काम होत आहे. प्रत्येक बोगदा साडेसहा मिटर व्यासाचा आहे. खोदाई होत असतानाच त्याला या यंत्राच्या साह्याने आतील बाजूने सिमेंटचे अस्तरही लावले जात आहे. आता स्वारगेटजवळून दुसऱ्या दोन बोगद्यांची खोदाई सुरू होईल. स्वारगेट जवळच्या पीसीएमटी स्थानकासमोर असलेल्या जुन्या स्वारगेट तलावाच्या जागेतून ही खोदाई सुरू होणार आहे. टीबीएन आत उतरवण्यासाठी या ठिकाणी दोन मोठे शाफ्ट (स्लोब-ऊतार) करण्यात आले आहेत. या बाजूने दोन व कृषी महाविद्यालयाकडून येणारे दोन बोगदे मंडईतील जुन्या झुणका भाकर केंद्राच्या जागेत एकत्र येतील. ही चारही टीबीएम याच जागेतून खालील बाजूसच सुटी करून वर घेतली जाणार आहेत. या जागेत चार बोगद्यांचे जाणाऱ्या व येणाऱ्या अशा दोन मेट्रोंसाठी सलग असे दोन बोगदे होतील.  या भूयारी मार्गाचे एकूण अंतर ५ किलोमीटर आहे. शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, कसबा पेठ, मंडई व स्वारगेट अशी एकूण ५ भूयारी स्थानके या मार्गात आहेत. स्थानकाच्या जागेत हे बोगदे एकत्र होतील व स्थानकातूनच प्रवाशांना जमीनीवर येण्यासाठीची व्यवस्था असेल. साधा जिना, सरकता जिना व लिफ्ट अशा तीनही सुविधा याठिकाणी असणार आहेत. जमीनीखाली २२ ते २८ फूट अंतरावर ही स्थानके असणार आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, फक्त खोदाईतच आधुनिक यंत्र वापरली जात नाहीत तर पुणे मेट्रोच्या मेट्रोसहितच्या स्थानक व प्रत्येकच कामातच गुणवत्ता व दर्जाविषयी जागरूकता ठेवली जात आहे. भूयारी मार्गाच्या कामाबरोबरच उन्नत मार्गाचेही काम सुरू आहे. वनाज ते गरवारे महाविद्यालय व पिंपरी-चिंचवड ते दापोडी हे दोन व प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. ते लवकर सुरू व्हावेत यासाठी त्यावर गतीने काम होत आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो