उत्तरनगरमध्ये तृतीयपंथीचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:59+5:302021-07-05T04:07:59+5:30

पुणे : उत्तमनगर परिसरात एका तृतीयपंथीने महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम हिसकाविली. त्यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणा-या महिलेचे कपडे ...

Third party rally in Uttarnagar | उत्तरनगरमध्ये तृतीयपंथीचा राडा

उत्तरनगरमध्ये तृतीयपंथीचा राडा

पुणे : उत्तमनगर परिसरात एका तृतीयपंथीने महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम हिसकाविली. त्यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणा-या महिलेचे कपडे फाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका ४० वर्षांच्या महिलेने उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी एका ४० वर्षांच्या तृतीयपंथीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

एक महिला उत्तमनगरमधील भाजी विक्री दुकानासमोर बसली होती. त्यावेळी या तृतीयपंथीने तिला मारहाण करून तिच्याकडे असलेले पैसे जबरदस्तीने घेत होता. त्यावेळी फिर्यादी महिला तिला सोडविण्यासाठी गेल्या असताना त्याने त्यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांच्याकडील २५० रुपये हिसकावून घेतले. त्यांचे कसे ओढून त्यांना रस्त्यावर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आणखी दोन महिलांच्या अंगावर धावून त्यांना हाताने मारहाण केली.

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Third party rally in Uttarnagar