शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

निवडणूक आयोगाच्या पथकाने पकडली रोकड, पुण्यातील तिसरी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 05:10 IST

पुण्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून रोकड जप्त करण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत.

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यातील पर्वती मतदार संघात चार स्थिर आणि चार भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यातील स्थिर पथक-१ च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान २ लाख  ३७ हजार ५०० रुपयांची रोकड जप्त केली. रोकड जप्त करण्यात आल्याची  पुण्यातील ही तिसरी घटना असून तीनही कारवाया पर्वती मतदार संघातच करण्यात आल्या आहेत. 

पथक प्रमुख सचिन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थिर पथक-१ चे अधिकारी व कर्मचारी यांनी सॅलिसबरी पार्क येथील पुनावाला गार्डनजवळ नाकाबंदी केली होती. आचार संहितेच्या अनुषंगाने मद्य वा रोकड वाहतुकीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. मध्यरात्री बाराच्या सुमारास एक निळ्या रंगाची मर्सिडीज बेंझ संशयास्पदरित्या जाताना दिसली. पथकाचे प्रमुख सचिन पवार, सौरभ कामठे, गणेश सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी मुल्ला, शिंदे व धोत्रे तसेच भरारी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक जू पवार व कुंटेवाढ  यांनी ही मोटार अडविली. मोटारीची तपासणी करीत असताना डिकीमध्ये २ लाख ३७ हजार ५०० रुपयांची रोकड मिळून आली. ही रक्कम वडगाव शेरी येथे राहणाऱ्या सलून व्यावसायिकाची असून ती जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम स्वारगेट पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. पुण्यामध्ये आचारसंहिता लागू झाल्यापासून रोकड जप्त करण्यात आल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यात १ ऑक्टोबर रोजी स्थिर पथक क्रमांक एकने कारवाई करीत महर्षीनगर येथे मध्यरात्री २ लाख ७२ हजार ३५० रुपयांची रोकड जप्त केली होती. तर शुक्रवारी ४ ऑक्टोबर रोजी स्थिर पथक क्रमांक दोनने अरण्येश्वर येथील संतनगर येथे नाकाबंदी दरम्यान ११ लाख १ हजार २६० रुपयांची रोकड जप्त केली होती. या तीनही कारवाया पर्वती विधानसभा मतदार संघात करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Puneपुणेparvati-acपार्वती