ठिकेकरवाडी ग्रामपंचायत निवडणूक सलग ८ बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:31 IST2021-01-08T04:31:47+5:302021-01-08T04:31:47+5:30
निवडणुकीसाठी तीन वाॅर्डातील इच्छुक ७ उमेदवार सर्वानुमते बैठकीत ठरविण्यात आले. परंतु वाॅर्ड क्रमांक २ मध्ये दोन अर्ज ...

ठिकेकरवाडी ग्रामपंचायत निवडणूक सलग ८ बिनविरोध
निवडणुकीसाठी तीन वाॅर्डातील इच्छुक ७ उमेदवार सर्वानुमते बैठकीत ठरविण्यात आले. परंतु वाॅर्ड क्रमांक २ मध्ये दोन अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध परंपरेला खंड पडेल, अशी चर्चा तालुक्यात सुरू होती. वाॅर्ड नं. २ मध्ये मुस्लिम समाजाची संख्या मोठी असल्याने या वाॅर्डातून मुस्लिम समजाला प्रतिनिधित्व देण्याचे ठरले होते. मात्र, ऐनवेळी प्रफुल्ल ठिकेकर यांनी अर्ज दाखल केल्यामुळे या वाॅर्डात निवडणूक होणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दत्ताशेठ ठिकेकर, शिवाजी ठिकेकर यांनी प्रफुल्ल ठिकेकर यांना समजावून सांगितले व मुस्लिम समाजाला ग्रामपंचायतमध्ये प्रतिनिधित्व दिले पाहिजे ही भूमिका घेतली. त्यामुळे प्रफुल्ल यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला व बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा केला.
अखेर सामाजिक कार्यकर्ते यांचा मान राखत अर्ज मागे घेतला व ठिकेकरवाडी ग्रामपंचायत सलग ८ पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. ठिकेकरवाडीच्या ग्रामस्थांनी उमेदवार प्रफुल्ल ठिकेकर यांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. ठिकेकरवाडी ग्रामपंचायतचे तीनही वाॅर्डातील बिनविरोध निवडून आलेले सदस्य खालीलप्रमाणे ---१) संतोष दगडू ठिकेकर, (२) प्रवीण कुंडलिक ठिकेकर, (३) फकिर बाबूभाई सय्यद, ( ४) सीमा भिमाजी ठिकेकर , (५) वृषाली दत्तात्रय ठिकेकर , (६) सविता अनिल ठिकेकर , (७) मनीषा सूर्यकांत रावत यांचा समावेश आहे.
--
फोटो : बिनविरोध निवडून आलेले सदस्य.