पीएमपी स्थानकावर प्रवाशाला लुटणारे चोरटे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:16 IST2021-08-21T04:16:01+5:302021-08-21T04:16:01+5:30

पुणे : कात्रज पीएमपी स्थानक परिसरात प्रवासी युवकाला धमकावून लुटणा-या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. रणजित शिवाजी ...

Thieves rob passengers at PMP station | पीएमपी स्थानकावर प्रवाशाला लुटणारे चोरटे गजाआड

पीएमपी स्थानकावर प्रवाशाला लुटणारे चोरटे गजाआड

पुणे : कात्रज पीएमपी स्थानक परिसरात प्रवासी युवकाला धमकावून लुटणा-या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. रणजित शिवाजी कुंभार (वय २५, रा. आंबेगाव खुर्द, कात्रज), राम राजू माने (वय २२, रा. कात्रज-कोंढवा रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत विशाल देवगिरीकर (वय २२, रा. वेल्हे) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देवगिरीकर कात्रज पीएमपी स्थानक परिसरात दोन दिवसांपूर्वी सकाळी थांबला होता. त्या वेळी आरोपी कुंभार आणि माने यांनी त्याला चाकूचा धाक दाखवित मारहाण करीत खिशातील १२०० रुपये तसेच मोबाइल संच असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. घाबरलेल्या कुंभारने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून दोघांना पकडले. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे तपास करत आहेत.

---

Web Title: Thieves rob passengers at PMP station