राहू येथे चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:39+5:302021-06-09T04:13:39+5:30
या प्रकरणी बाळासाहेब जगदाळे यांनी यवत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार चोरीचा तपास लागून या कुटुंबाला यवत ...

राहू येथे चोरट्यांचा धुमाकूळ
या प्रकरणी बाळासाहेब जगदाळे यांनी यवत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार चोरीचा तपास लागून या कुटुंबाला यवत पोलिसांकडून न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे चोरीच्या या सत्रामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर काही वर्षांपूर्वी शिंदे नगर या ठिकाणी शांताराम शिंदे यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून भरदिवसा दुपारच्या सुमारास पंचवीस ते तीस तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले होते, मात्र त्याचा तपास अद्याप लागला नसल्याने त्या कुटुंबाला अद्याप न्याय मिळाला नसल्याची वस्तुस्थिती आहे
राहू परिसरात शेतकऱ्यांच्या उपसा सिंचन योजनांच्या विद्युत पंप सेट केबल आणि इलेक्ट्रिकल साहित्य यांच्या चोऱ्या सातत्याने होत असतात मात्र अद्याप हे चोर पोलिसांच्या जाळ्यात का अडकले नाहीत, हा मोठा प्रश्न ग्रामस्थांन समोर आहे. एकूणच अशा प्रकारच्या चोऱ्यांना आळा बसून अशा चोऱ्या करणाऱ्या गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी परिसरातून होत आहे