चोरट्यांनी केला महिलेचा खून

By Admin | Updated: January 23, 2017 02:23 IST2017-01-23T02:23:31+5:302017-01-23T02:23:31+5:30

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २०) अज्ञात चोरट्याने केलेल्या हल्ल्यात सजनबी हबीब शेख

The thieves murdered the woman | चोरट्यांनी केला महिलेचा खून

चोरट्यांनी केला महिलेचा खून

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २०) अज्ञात चोरट्याने केलेल्या हल्ल्यात सजनबी हबीब शेख (वय ५७) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अद्याप कुणालाच ताब्यात घेण्यात आलेले नाही. याबाबतची फिर्याद सजनबी शेख यांचा सावत्र मुलगा याकुब हबीब शेख यांनी लोणी काळभोर पोलिसांत दिली.
पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सजनबी यांचे पती हबीब शेख हे शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास पाणी तापवण्यासाठी उठले. त्या वेळी ही घटना उघडकीस आली. सजनबी झोपलेल्या खोलीत चोरट्यांनी दरवाजाला लावलेले कुलूप तोडून चोरी करण्यासाठी घरामध्ये प्रवेश केला. या वेळी सजनबी शेख यांनी प्रतिकार केला असता, चोरट्याने सजनबी यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच उशीने त्यांचे तोंड दाबून त्यांचा खून केला. घरामधून रोख रक्कम व मोबाईल असा सुमारे ५००० रुपयांचा माल चोरीला गेला आहे. फिर्यादी याकुब शेख याने दिलेल्या जबाबावरून लोणी काळभोर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना घडली, त्या ठिकाणी दाट लोकवस्ती असून, यांबाबत नजीक राहणाऱ्या त्यांची सवत, सावत्र मुले व इतर कुटुंबीयासमवेत शेजाऱ्यांना कसलाही थांगपत्ता लागला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मृत सजनबी यांच्या खोलीला रात्रीच्या वेळी बाहेरून कुलूप लावले जायचे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. घटनेची माहिती मिळताच बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कडूकर यांनी घटनास्थळी भेट देऊन दिली.

Web Title: The thieves murdered the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.